शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
2
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
3
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
6
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
7
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
8
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
9
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
10
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
11
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
12
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
13
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
14
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
15
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
16
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
17
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
18
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
19
राेज ६ मिनिटं वाचन केलं तर मानसिक तणाव होतो कमी, वाचनाची सुटलेली सवय लावायची सोपी युक्ती
20
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

सरकारचे नियम आपल्या भल्यासाठीच, ते पाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2020 12:40 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोनापासून वाचण्यासाठी घरातच राहून सरकारचे नियम पाळणे हाच खरा पर्याय असून शासनाच्या सूचना आपल्या ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : कोरोनापासून वाचण्यासाठी घरातच राहून सरकारचे नियम पाळणे हाच खरा पर्याय असून शासनाच्या सूचना आपल्या सर्वांच्या भल्यासाठी आहेत़ ते पाळा असे आवाहन करीत खासदार डॉ़ हीना गावीत यांनी आपण वयाने लहान असलो तरी या संकटाच्या काळात मतदारसंघातील पालकत्त्वाचे भान असून त्यासाठी आपण तत्पर असल्याची ग्वाही ‘लोकमत’शी बोलताना दिली़कोरोना संदर्भातील उपाययोजना व जनजागृतीच्या पार्श्वभूमीवर खासदार डॉ़ गावीत बोलत होत्या़ त्यांनी सांगितले की, आपला मतदारसंघ गुजरात आणि मध्यप्रदेश सीमेवर असल्याने अनेक खबरदारीच्या उपाययोजना आवश्यक आहेत़ त्यादृष्टीने सुरु आहेत़ राज्यांच्या सीमा सील केल्या असून दुसऱ्या राज्यातील व्यक्तींना तसेच दुसºया जिल्ह्यातील व्यक्तींनाही प्रवेश बंदी करण्यात आली आहे़ मतदारसंघातील गावांमध्ये फिरुन कोरोनापासून घ्यावयाची काळजी संदर्भात लोकांना माहिती देत आहे़ त्याचबरोबर या काळात लोकांच्या समस्याही वाढल्या आहेत़ त्या सोडवण्या संदर्भात प्रशासनाला सूचनाही दिल्या आहेत़प्रश्न:- एक डॉक्टर म्हणून आपल्याला या काळात काम करताना काय फायदा होत आहे़उत्तर:- निश्चितच लोकांना कोरोनाची साखळी तोडण्यासाठी काय केले पाहिजे व काय करु नका ते योग्य पद्धतीने समजावून सांगता येत आहे़ विशेषत: मुंबई येथे जेजे रुग्णालयात आपण निवासी वैद्यकीय अधिकारी असताना स्वाईन फ्ल्यूची साथ होती़ ते प्रकरण आपण हाताळले आहे़ त्याचाही अनुभव असल्याने डॉक्टरांनाही त्याबाबत सूचना देताना व त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी त्याचा फायदा होत आहे़प्रश्न:- मतदारसंघातील लोकांनी अजून काय काळजी घेतली पाहिजे असे आपल्याला वाटते़उत्तर:- सध्या भाजीविक्रेत्यांच्या संख्येत वाढ झाली आहे़ त्यामुळे प्रत्येक विक्रेत्याने मास्क लावले पाहिजे़ याची सूचना आपण दिली आहे़ त्याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे़ जिल्ह्याच्या सीमा बंद केल्या असल्या तरी अजूनही छुप्या पद्धतीने काही मजूर वर्ग, नोकरवर्ग येत आहे़ अर्थात प्रत्येकाच्या वेगवेगळ्या अडचणी आहेत़ परंतू आहे त्या ठिकाणीच सर्वांनी थांबणे यातच सर्वांचे हित आहे़ कारण त्यातून स्वत:ला व इतरांना धोका उद्भवू शकतो़ लॉकडाऊनच्या काळात वैद्यकीय कर्मचारी, पोलीस कर्मचारी हे सतत बाहेर आहेत़ लोकांची ते काळजी घेत आहेत़ त्यामुळे त्यांचीही काळजी घेणे आवश्यक असून त्यांनीही स्वत: काही गोष्टी पाळण्याची गरज आहे़प्रश्न:- एक लोकप्रतिनिधी म्हणून लोकांच्या आपल्याकडे अनेक अपेक्षा आहेत़ त्यासाठी आपण काय करीत आहात़उत्तर:- मी या मतदार संघाची खासदार आहे़ याची मला जाण आहे़ त्यामुळे वयाने लहान असली तरी पालकत्त्वाची जबाबदारी निश्चितच घेऊन त्यादृष्टीने काम करीत आहे़ या काळात मतदारसंघातील प्रत्येक तालुक्यात जाऊन आपण आढावा बैठका घेतल्या, लोकांशी संपर्क केला़ सोशल डिस्टन्सिंगबाबत जनजागृती केली़ विशेषत: लॉकडाऊनमुळे अनेकांचे नातेवाईक इतर राज्यात व परदेशातही अडकले आहेत़ त्यांचेही प्रश्न सोडवण्याबाबत प्रयत्न होत आहे़ ते ज्या भागात राहतात़ त्या भागात सुरक्षित रहावेत व त्यांना सुविधा मिळाव्यात यासाठी सातत्याने संपर्क सुरु आहे़ विदेशात असणाºया नागरिकांबाबतही परराष्ट्रमंत्री व त्या-त्या देशातील राजदूतांसोबत बोलून त्या भागात लोकांना मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत़आपल्या भागात प्रशासनाने चांगले काम केल्याने आणि लोकांनीही नियम पाळल्याने आतापर्यंत कोरोनाला रोखण्यासाठी आपण यशस्वी झालो़ यापुढेही हीच खबरदारी आपल्याला घ्यायची असून कोरोनामुक्त जिल्ह्याची ओळख कायम ठेवायची आहे़ त्यासाठी जनतेनेही सहकार्य करावे, असे आवाहन खासदार डॉ़ हीना गावीत यांनी केले़