परीक्षा केंद्रात फिरणाऱ्या २३ जणांवर गुन्हे दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2020 12:37 PM2020-02-20T12:37:02+5:302020-02-20T12:37:08+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : बारावीच्या पहिल्या पेपरला बाहेरून कॉपी पुरविण्याच्या प्रयत्न करणाºया तब्बल २३ जणांवर तळोदा पोलिसांनी मनाई ...

Five of them who turned up at the examination center were booked | परीक्षा केंद्रात फिरणाऱ्या २३ जणांवर गुन्हे दाखल

परीक्षा केंद्रात फिरणाऱ्या २३ जणांवर गुन्हे दाखल

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : बारावीच्या पहिल्या पेपरला बाहेरून कॉपी पुरविण्याच्या प्रयत्न करणाºया तब्बल २३ जणांवर तळोदा पोलिसांनी मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलीस अधीक्षकांनी संबधीत पोलीस अधिकाऱ्यांना कारवाईचे सक्त आदेश दिले आहेत.
दहावी व बारावीच्या परीक्षांच्या वेळी बाहेरून कॉपी पुरविणे, परीक्षा केंद्र परिसरात उपद्रव करणाºया व्यक्तींविरुद्ध थेट जमावबंदी व मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्याचे निर्देश पोलीस अधीक्षकांनी दिले आहेत. त्याची अंमलबजावणी पहिल्या पेपरपासूनच सुरू झाली आहे. मंगळवारी पहिल्या पेपरला तळोदा येथील परीक्षा केंद्रावर कॉपी पुरविण्याचा प्रयत्न करणाºया, परीक्षा केंद्राच्या १०० मिटर आत प्रवेश करणाºयांवर तळोदा पोलिसांनी थेट कारवाई केली आहे. एकुण २३ जणांविरुद्ध जिल्हाधिकाºयांनी लागू केलेल्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याचा गुन्हा तळोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्वच फिर्यादी या पोलीस कर्मचाºयांनी दिल्या आहेत.
नंदुरबार तालुक्यातील खोंडामळी येथे देखील परीक्षा केंद्र परिसरात विनापरवानगी उपस्थित असलेल्या जमावावर पोलिसांनी थेट कारवाई केली होती. यातून झालेल्या पळापळीमुळे दहा ते १२ दुचाकींचे देखील नुकसान झाल्याचा प्रकार घडला होता़
दरम्यान, यापुढे देखील परीक्षेदरम्यान बाहेरून कॉपी पुरविणाºयांविरुद्ध पोलिसांकडून थेट गुन्हे दाखल करण्यात येतील. त्यामुळे पालकांनी आपल्या पाल्यांना परीक्षा केंद्रात सोडल्यानंतर वेळेत परीक्षा केंद्रातून बाहेर पडावे. विनाकारण परीक्षा केंद्र परिसरात रेंगाळू नये असे आवाहन पोलीस दलाकडून करण्यात आले आहे.

Web Title: Five of them who turned up at the examination center were booked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.