शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
2
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
3
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
4
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
5
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
6
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
7
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
8
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
9
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
10
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
11
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
12
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
13
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
14
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
15
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
16
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
17
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
18
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
19
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
20
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
Daily Top 2Weekly Top 5

खोटे लग्न लावून फसवणूकप्रकरणी पाच जणांना कोठडी तर सूत्रधारासह तिघांचा शोध सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:28 IST

याबाबत सविस्तर माहिती अशी की, शहादा तालुक्यातील मंदाणे येथील युवक भूषण संतोष सैंदाणे यांच्याशी बाबाराव देवराम आमले (रा. औरंगाबाद) ...

याबाबत सविस्तर माहिती अशी की, शहादा तालुक्यातील मंदाणे येथील युवक भूषण संतोष सैंदाणे यांच्याशी बाबाराव देवराम आमले (रा. औरंगाबाद) यांनी सोनू राजू शिंदे (रा.हिंगोली) या युवतीशी एक लाख ३० हजार रुपये व वधूला काही दागिने देण्याच्या बोलीवर लग्न निश्चित करण्यात आले होते. ६ मे रोजी मंदाणे येथे भूषण संतोष सैंदाणे यांच्याशी लग्न समारंभ पार पडला होता. मात्र अवघ्या दहा दिवसातच मुलीने पोबारा करून दुसऱ्याच तरुणाशी लग्न करण्याचा प्रकार उघडकीस आल्याने मंदाणे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी भूषण सैंदाणे यांनी फसवणूक झाल्याची फिर्याद दिल्याने आठ जणांविरुद्ध शहादा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला. अटकेत असलेल्या सोनू शिंदे, पूजा साळवे, योगेश साठे, मुलीची आई वंदना शिंदे, रवींद्र गोपाळ यांना तीन दिवस पोलीस कस्टडी मिळाली असून मुख्य सूत्रधार बाबाराव आमले (रा. औरंगाबाद), मुलीचा भाऊ भैरव शिंदे, प्रीती कांबळे (रा. हिंगोली) हे फरार होण्यात यशस्वी झाले.

राज्यभरात पाळेमुळे

एखाद्या सामान्य कुटुंबाला हाताशी धरून मुलीच्या आई-वडिलांना पैशांचे आमिष दाखवून तरुणांना लग्नाच्या जाळ्यात अडकवून व बनावट लग्न उरकून लाखो रुपये लुटणाऱ्या या टोळीचा पोलिसांनी वेळीच गांभीर्य घेतल्याने पर्दाफाश झाला असलातरी अशा अनेक टोळ्या असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. राज्यभरात या टोळ्यांची पाळेमुळे खोदून काढल्यास अनेकांची फसवणूक झाल्याचे उघड झाल्याशिवाय राहणार नाही, अशी प्रतिक्रिया जाणकार व्यक्तींनी व्यक्त केली आहे. संबंधित तरुणीचे आतापर्यंत किती जणांशी लग्न लावण्यात आले आहे, याचीही चौकशी झाल्यास बऱ्याच गोष्टी उघड होतील. सूत्रधारास पकडल्यास अनेक गुन्हे उघडकीस येणार आहेत. या टोळीतील मुख्य सूत्रधार बाबाराव आमले याच्यासह दोन्ही फरार आरोपी पकडले गेल्यास त्यांनी सोनू शिंदेसारख्या अशा किती मुलींना पुढे करत किती तरुणांना बनावट लग्न लावून लाखो रुपयात फसवले या सर्व बाबी निश्चितपणे उघड होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या संपूर्ण गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक दीपक बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सुरेश सोनवणे, असलोद दूरक्षेत्राचे हवालदार दीपक परदेशी, हवालदार चौरे, अमृत पाटील, विश्वास साळुंके हे करीत आहेत.

तरुणांची लग्न करून फसवणूक करीत लाखो रुपये लुटणाऱ्या टोळीने संपूर्ण खान्देशात अशा अनेक घटना केल्या आहेत. अशा पद्धतीने ज्या कोणाची फसवणूक झाली असल्यास त्यांनी तत्काळ शहादा पोलिसांशी संपर्क करावा.

-दीपक बुधवंत, पोलीस निरीक्षक, शहादा पोलीस स्टेशन