१४ हजार जणांनी घेतला पहिला डोस, शहरी भागात अधीक प्रमाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:28 IST2021-03-24T04:28:40+5:302021-03-24T04:28:40+5:30

नंदुरबार : जिल्ह्यात २२ मार्चपर्यंत १४ हजार ६०५ जणांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली. यापैकी नऊ हजार ३५७ जणांनी ...

The first dose was taken by 14,000 people, more in urban areas | १४ हजार जणांनी घेतला पहिला डोस, शहरी भागात अधीक प्रमाण

१४ हजार जणांनी घेतला पहिला डोस, शहरी भागात अधीक प्रमाण

नंदुरबार : जिल्ह्यात २२ मार्चपर्यंत १४ हजार ६०५ जणांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली. यापैकी नऊ हजार ३५७ जणांनी दुसरा डोस घेतला आहे. लसीकरणात अजूनही शहरी भागातच आघाडी कायम आहे.

जिल्ह्यात सुरुवातीला केवळ सहा ठिकाणी लसीकरणाची सोय होती. नंतर ती वाढवून एकुण ४२ ठिकाणी करण्यात आली आहे. सद्या ६० वर्षावरील सर्वांना तर ४५ वर्षवयोगटातील व्याधीग्रस्तांना ही लस दिली जात आहे. पहिली लस घेणाऱ्यांची संख्या १४ हजार ६०५ इतकी आहे. दुसरा डोस घेणाऱ्यांचे प्रमाण हे ३८ टक्के आहे. त्यांची संख्या ही नऊ हजार ३५७ इतकी आहे. तर पहिला डोस घेणाऱ्यांचे प्रमाण हे ४२.२ टक्के इतके आहे.

एकुण डोस घेणाऱ्यांमध्ये शहरी भागात ६५ तर ग्रामिण भागात ३५ टक्के इतके प्रमाण आहे. आता ग्रामिण भागात देखील लसीकरणाची सोय झाल्याने ग्रामिण भागातील टक्केवारी देखील वाढण्याची शक्यता आहे.

Web Title: The first dose was taken by 14,000 people, more in urban areas