अर्जांचा पहिला दिवस निरंक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2019 12:07 IST2019-12-19T12:07:32+5:302019-12-19T12:07:37+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्हा परिषद व पंचायत समिती गट व गणांसाठी अर्ज दाखल करण्यास बुधवार, १८ पासून ...

First day application forms | अर्जांचा पहिला दिवस निरंक

अर्जांचा पहिला दिवस निरंक


लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्हा परिषद व पंचायत समिती गट व गणांसाठी अर्ज दाखल करण्यास बुधवार, १८ पासून सुरुवात झाली. परंतु पहिला दिवस निरंक राहिला. दरम्यान, सहाही तहसील कार्यालयांमध्ये निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय सज्ज होते. पोलीस बंदोबस्तही पुरेसा लावण्यात आला होता.
आॅनलाईन अर्ज भरून त्याची प्रिंट आणि आवश्यक कागदपत्रे उमेदवारांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे सादर करणे आवश्यक आहे. त्यानुसार आजचा पहिला दिवस आॅनलाईन अर्ज भरण्यासंदर्भातील माहिती घेण्यातच अनेक उमेदवारांचा गेला.
शिवाय सर्वच पक्षांनी अद्याप उमेदवार यादी जाहीर केलेली नसल्याने इच्छूक देखील वेट अ‍ॅण्ड वॉचच्या भुमिकेत आहेत. तरीही अशा इच्छुकांनी आपली कागदपत्रे सज्ज ठेवली आहेत. नंदुरबार, शहादा, नवापूर, तळोदा, अक्कलकुवा धडगाव तहसील कार्यालयांमध्ये निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालय सुरू करण्यात आले आहेत. अशा ठिकाणी आचारसंहिता कक्ष देखील वेगळा ठेवण्यात आला आहे. सर्वच ठिकाणी आवश्यक तो पोलीस बंदोबस्त तैणात करण्यात आलेला आहे. शेवटच्या दोन दिवसात अर्ज भरण्यासाठी गर्दी होण्याची शक्यता आहे.

Web Title: First day application forms