ठाणेपाडा वनक्षेत्रातील आगीत १४० हेक्टर वनक्षेत्राचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:28 IST2021-03-15T04:28:22+5:302021-03-15T04:28:22+5:30

दरम्यान ही आग लागण्याचे प्रमुख कारण हे याभागात असलेला सुझलाॅनचा टावर असल्याची माहिती समोर आली आहे. या टाॅवरवर वेळोवेळी ...

Fire in Thanepada forest area damaged 140 hectares of forest area | ठाणेपाडा वनक्षेत्रातील आगीत १४० हेक्टर वनक्षेत्राचे नुकसान

ठाणेपाडा वनक्षेत्रातील आगीत १४० हेक्टर वनक्षेत्राचे नुकसान

दरम्यान ही आग लागण्याचे प्रमुख कारण हे याभागात असलेला सुझलाॅनचा टावर असल्याची माहिती समोर आली आहे. या टाॅवरवर वेळोवेळी होणाऱ्या स्पार्किंगमुळे आग लागल्याचे निष्पन्न झाल्याचे समजते. विशेष बाब ही म्हणजे या टाॅवरवर एकाचवेळा दोनपेक्षा अधिक वेळा स्पार्किंग झाल्याने आग लागली असावी, असा अंदाज आहे.

भविष्यातही याचप्रकारे ठिगण्या पडून वनक्षेत्रात गंभीर आग लागू शकते. यामुळे हा टाॅवर येथून काढण्यात यावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान वनक्षेत्र हद्दीलगत किंवा हद्दीतून रस्ते किंवा इतर प्रकल्प जात असल्यास वनविभागाकडून पडताळणी करण्यात येते. यातील धोके लक्षात घेतल्यानंतर पुढील कारवाई होते. पवनऊर्जा प्रकल्पामुळे असंख्य धोके असतानादेखील वनक्षेत्रात सुझलाॅनला परवानगी देण्यात आल्याने येत्या काळात पुन्हा आगीची घटना घडल्यास जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित होते.

सोमवारी देण्यात येणाऱ्या अहवाला सुझलाॅनच्या टाॅवरमुळे आग लागल्याचे स्पष्ट झाल्यास संबंधित कंपनीवर वनविभागाच्या नियमनानुसार वनगुन्हे दाखल करून कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात येत आहे.

Web Title: Fire in Thanepada forest area damaged 140 hectares of forest area