वीजपुरवठा जोडणीसाठी ग्राहकांना आर्थिक भुर्दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2021 05:00 IST2021-02-28T05:00:29+5:302021-02-28T05:00:29+5:30

या निवेदनात म्हटले आहे की, वीज ग्राहकांकडून वसुलीसाठी वीज बिल न भरणाऱ्यांचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात येत आहे. बिल ...

Financial burden on customers for power supply connection | वीजपुरवठा जोडणीसाठी ग्राहकांना आर्थिक भुर्दंड

वीजपुरवठा जोडणीसाठी ग्राहकांना आर्थिक भुर्दंड

या निवेदनात म्हटले आहे की, वीज ग्राहकांकडून वसुलीसाठी वीज बिल न भरणाऱ्यांचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात येत आहे. बिल भरल्यानंतर वीजपुरवठा जोडण्यासाठी वेगळे शुल्क आकारण्यात येत असल्याची तक्रार ग्राहक पंचायत महाराष्ट्र तळोदा शाखेला प्राप्त झालेली आहे. सध्या कोरोना महामारीमुळे सर्वच क्षेत्रात रोजगार, उद्योगधंदे, मजुरी ठप्प झाली आहे. सर्वसामान्य ग्राहक अडचणीत सापडला असून अशावेळी वीज बिल वसुलीची सक्ती करण्यात येऊ नये, सर्वसामान्य ग्राहकांना वीज बिल भरण्यासाठी सवलत देण्यात यावी. तसेच त्यांचा विद्युत पुरवठा खंडित करू नये व खंडित केलेला वीजपुरवठा जोडणी करताना कुठलेही शुल्क आकारण्यात येऊ नये, असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी ग्राहक पंचायत महाराष्ट्र तळोदा शाखेचे अध्यक्ष ए.डी. सूर्यवंशी, जिल्हा संघटक प्रा.आर.ओ. मगरे, डॉ.एस.एन. शर्मा, तालुका संघटक रमेशकुमार भाट, राजेश चौधरी आदींसह ग्राहक पंचायत महाराष्ट्र तळोदा शाखेचे कार्यकर्ते उपस्थित होते.क

Web Title: Financial burden on customers for power supply connection