शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
3
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
4
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
5
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
6
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
7
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
8
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
9
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
10
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
11
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
12
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
13
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
14
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
15
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
16
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
17
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
18
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
19
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
20
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
Daily Top 2Weekly Top 5

अखेर शेतकऱ्याने केळीवर फिरविला नांगर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2020 12:27 IST

लोकमत न्यूज नेटवर्क बामखेडा : शहादा तालुक्यातील मोहिदा त.ह. येथील शेतकऱ्यांनी परिपक्व झालेल्या केळीच्या चार एकर क्षेत्रात व्यापाºयांकडून मागणी ...

लोकमत न्यूज नेटवर्कबामखेडा : शहादा तालुक्यातील मोहिदा त.ह. येथील शेतकऱ्यांनी परिपक्व झालेल्या केळीच्या चार एकर क्षेत्रात व्यापाºयांकडून मागणी नसल्याने, चार एकर क्षेत्रातील उभ्या पिकाला तवा फिरवण्याची वेळ शेतकºयांवर आली आहे.गेल्या महिनाभरापासून लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. विशेषत: नाशवंत शेतमाल उत्पादक शेतकरी लॉकडाऊनमुळे अडचणीत आला आहे. केळी उत्पादक शेतकºयांनी पीक उभे करण्यासाठी लाखो रूपये खर्च करूनही काही केळी उत्पादक शेतकºयांना मातीमोल भावात विकावे लागले तर काही शेतकºयांवर तवा फिरवण्याची परिस्थिती निर्माण झाली.तालुक्यातील केळी मोठ्या प्रमाणात निर्यात होत असते. त्यांना तालुक्यातील केळी क्षेत्रही वाढले होते. दुसरीकडे आंतरराष्ट्रीय बाजारपेठ बंद असल्याने निर्यात शक्य नाही. वाहतूक ठप्प असल्याने व्यापाºयांनी खरेदीकडे पाठ फिरवली आहे. खरेदीदार नसल्याने शेतकºयांच्या स्वप्नावर पाणी फिरले आहे.एक हजार झाडामागे ५० हजार ते लाख रूपये खर्च करावा लागतो. सध्या केळीची विक्री पूर्णपणे थांबली असल्यामुळे लागवडीचा खर्चदेखील निघत नाही. व्यापाºयांकडून मागणीदेखील बंद झाली आहे. यामुळे शेतकºयांना आर्थिक नुकसानाला सामोरे जावे लागले आहे. कोरोनामुळे नैसर्गिक संकट शेतकºयांच्या वाट्याला आले आहे. त्यात शेतकरी मोठ्या प्रमाणात संकटात सापडला आहे. त्याला पुन्हा उभे राहण्यासाठी कोरोनाचा फटका बसलेल्या शेतकºयांना मदतीचा हात द्यावा अशी अपेक्षा होत आहे. सावकारी कर्ज काढून शेती गुंतवणूक केल्याने कर्ज फेडायचे कसे? कष्टाने पिकवूनही विक्री न झाल्यामुळे केलेला खर्च आणायचा कुठून? असे अनुत्तरित प्रश्न शेतकºयांच्या मनात आहेत. शहादा तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाला असून, आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. शासनाने नुकसानग्रस्त शेतकºयांचे पंचनामे करून अनुदान लवकरात लवकर द्यावे अशी मागणी केळी उत्पादक शेतकºयांकडून करण्यात येत आहे.चार एकर क्षेत्रात केळी पिकाची लागवड केली होती. या वर्षीदेखील ती चांगली बहरली होती. मात्र कोरोनामुळे होत्याचे नव्हते झाले. संचारबंदी सुरू झाल्याने शेतातील एक डझन केळीचीदेखील विक्री होऊ शकली नाही. त्यामुळे सरासरी साते आठ लाख रूपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे नाईलाजाने केळीच्या क्षेत्रात तवा फिरवावा लागला..-प्रकाश छगन पाटील, मोहिदा त.ह., केळी उत्पादक शेतकरी.