शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

शेवटी नागरिकांना बुजवावे लागताहेत खड्डे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2019 12:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यातील विविध भागात खराब रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजवण्यासाठी नागरिक पुढे येत असून त्यांच्याकडून श्रमदानातून ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यातील विविध भागात खराब रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजवण्यासाठी नागरिक पुढे येत असून त्यांच्याकडून श्रमदानातून खड्डे बुजवण्याचे काम हाती घेण्यात येत आह़े यामुळे एकीकडे खड्डे बुजवले जात असले तरी सार्वजनिक बांधकाम विभागाचे रस्ते दुरुस्तीबाबतची उदासितना प्रकर्षाने समोर येत आह़े कुकावल ता़ शहादाशहादा - शिरपूरदरम्यान ब:हाणपूर-अंकलेश्वर महामार्गावर मोठमोठे खड्डे पडले असून दररोज अपघात घडत आहेत़ खड्डय़ांमुळे काहींना मणक्यांच्या त्रास सुरू झाला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने दखल घेतली नसल्याने कुकावल ता. शहादा  येथील तरुणांनी स्वखर्चाने साईडपट्टय़ा व खड्डे भरण्याचे काम सुरु केले. कुकावल शहादा दरम्यान काही महिन्यांपूर्वीच रस्त्याचे नूतनीकरण, डागडुजी करण्यात आली होती.परंतु निकृष्ट कामाचे पितळ पावसामुळे उघडे पडले होत़े रस्त्यावर गुडघ्या एवढे खड्डे झाल्याने दररोज किरकोळ अपघात होत आहेत. दोन दिवसांपूर्वीच याठिकाणी ट्रक उलटल्याची घटना घडली होती़ सुदैवाने त्यात कोणतीही जीवितहानी झाली नाही़  वारंवार होणा:या अपघातांना अटकाव व्हावा, यासाठी कुकावल येथील  जितेंद्र देसले, रज्जाक पटेल, संजय कोळी, अक्षय गवळे, नानूभाऊ भील या युवकांनी स्वयंस्फूर्तीने खड्डे बुजवण्याचे व साईड पट्टी भरण्याचे काम सुरू केल़े यावेळी सरपंच प्रतिनिधी राहुल सनेर उपस्थित होते. दरम्यान या मार्गावरील खड्डे कायम धोकेदायक ठरत आहेत़ मार्गावरुन अवजड वाहने मोठय़ा संख्येने जात असल्याने रस्ताच टिकाव धरत नसल्याने दिसून आले आह़े मार्गावरुन प्रवास करणे अत्यंत जिकिरीचे झाले असल्याने प्रवासी हैराण झाले आहेत़ गेल्यावर्षीही या मार्गावर खड्डय़ामुळे एकाचा बळी गेला होता़  त्यावेळी एका मजुराने खड्डा बुजवत सामाजिक दायित्त्व निभावले होत़े ऐचाळे ऐचाळे येथील नूतन माध्य व उच्च माध्य माध्यमिक विदयालयाच्या विद्यार्थी आणि शिक्षकांनी ऐचाळे येथील रस्त्यावर मोठमोठे खड्डे बुजवल़े शिक्षक व विद्याथ्र्यानी म्हसोबा नाला ते ऐचाळे गावार्पयतचा एक किलोमीटरच्या अंतरात माती व इतर साहित्य टाकून भराव करुन दिला़ यावेळी शिक्षक विजय शामराव साबळे व अनिल साहेबराव पाटील यांनीही श्रमदान केले.