शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
2
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
3
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
4
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
5
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
6
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
7
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
8
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
9
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
10
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
11
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
12
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
14
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
15
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
16
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
17
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
18
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
19
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
20
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

अखेर 17 वर्षानंतर ‘पेप्सी’ पोलिसांच्या हाती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2019 13:01 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : 17 वर्षापूर्वी नंदुरबार झालेल्या खुनाच्या गुन्ह्यातील  मुख्य संशयीतास राजस्थानमधून ताब्यात घेण्यास स्थानिक गुन्हा अन्वेशन ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : 17 वर्षापूर्वी नंदुरबार झालेल्या खुनाच्या गुन्ह्यातील  मुख्य संशयीतास राजस्थानमधून ताब्यात घेण्यास स्थानिक गुन्हा अन्वेशन शाखेच्या पथकाला यश मिळाले. पेप्सी उर्फ किशोरसिंह बालावत (36) रा.अजित, ता.शिवना, जि.बाडमेर असे संशयीताचे नाव  आहे. नंदुरबारातील वेडू गोविंदनगरमध्ये 1 जून 2003 रोजी ही घटना घडली होती. अॅड.अनिल लोढा यांचे बंधू व व्यापारी पारस  लोढा यांच्याकडे पुष्पेंद्रसिंह उर्फ पेप्सी भवरसिंह उर्फ किशोरसिंह बालावत याच्यासह इतर दोघांनी किराणा दुकानातील मजुरीच्या पैशांतून वाद घालून मारहाण  करीत ठार केले होते. याबाबत  नंदुरबार शहर पोलिसात तिघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटना घडल्यापासून तिन्ही संशयीत आरोपी फरार होते. पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी फरार गुन्हेगारांची शोध मोहिम घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार स्थानिक गुन्हा अन्वेशन शाखेचे वरिष्ठ निरिक्षक किशोर नवले यांनी 15 वर्षापूर्वीच्या गुन्ह्यातील फरार आरोपींवर लक्ष केंद्रीत केले. त्यानुसार लोढा यांच्या खुनाच्या गुन्ह्यातील संशयीतांविषयी त्यांना गुप्त माहिती मिळाली. संशयीतापैकी पेप्सी हा बाडमेर जिल्ह्यात त्याच्या राहत्या गावी आला असल्याची माहिती नवले यांना मिळाल्यावर त्यांनी लागलीच पथक तयार करून रवाना केले. परंतु 1100 किलोमिटर लांब, राजस्थानमधील विरळ वस्तींचे गावे आणि भाषा व वेश याची अडचण यामुळे मोहिम फत्ते होईल किंवा कसे याची शंका मनात असतांना त्यांनी पथकाचे मनोधैर्य वाढवून रवाना केले. पथक बाडमेर जिल्ह्यातील समदडी येथे पोहचल्यावर स्थानिक पोलिसांशी संपर्क साधला. राजस्थानी पेहराव करून संशयीत राहत असलेल्या अजित या गावाची आणि परिसराची बारकाईने माहिती घेत निरिक्षण केले. गावात जाण्याचा आणि गावातून बाहेर येण्याचा मार्ग समजून घेतला. त्यानुसार 6 नोव्हेंबरची रात्र आणि 7 नोव्हेंबरची उत्तर रात्र या दरम्यान अचानक धाड टाकण्याचे ठरविण्यात आले. स्थानिक पोलिसांच्या            मदतीने पथक गावात पोहचल्यावर अचानक वादळ सुरू झाले. परिणामी काही काळ मोहिम थांबवावी लागली. या दरम्यान पथक निरिक्षिक किशोर नवले यांच्या संपर्कात होते. ते वेळोवेळी पथकाचे मनोधैर्य वाढवीत होते. वादळ शांत झाल्यानंतर ठरल्याप्रमाणे पथकाने पेप्सीच्या घरावर धाड टाकत त्याला ताब्यात घेतले. 17 वर्षापूर्वी घडलेल्या गुन्ह्यातील संशयीताचे कुठलेही छायाचित्र किंवा स्केच पोलिसांकडे नव्हते. संशयीतांची काहीही माहिती नव्हती. शिवाय एवढय़ा दूर असलेल्या गावात जावून संशयीताचा ताब्यात घेण्याचे दिव्य देखील होतेच. परंतु या सर्वावर मात करून एलसीबीचे निरिक्षक किशोर नवले यांनी पथकाला तयार केले. त्यांना बारीकसारीक बाबी समजून सांगितल्या. येणारी संकटे आणि अडचणी यांची जाणीव करून देत मनोधैर्य वाढविल्याने ही मोहिम फत्ते झाल्याचे पथकातील सदस्यांनी सांगितले. 7 रोजी सकाळी पथक संशयीत पेप्सी उर्फ किशोरसिंह बालावत याला घेवून नंदुरबारकडे निघाले. या सर्व मोहिमेत पथकाला समदडी पोलीस ठाण्याचे निरिक्षक मिळुराम मिना व त्यांच्या पथकाचे मोठे सहकार्य मिळाले.ही कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अपर अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा अन्वेशन शाखेचे निरिक्षक किशोर नवले, फौजदार भगवान कोळी, हवालदार प्रदीप राजपूत, किरण पवार, मोहन          ढमढेरे, जितेंद्र ठाकूर यांच्या पथकाने केली.