माजी विद्याथ्र्याकडून फिल्टर प्लॅन भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2019 12:42 PM2019-11-22T12:42:51+5:302019-11-22T12:42:56+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क प्रकाशा : शहादा तालुक्यातील प्रकाशा  येथील सर्वोदय विद्या मंदिरात 1992 मध्ये दहावीच्या वर्गात शिक्षण घेणारे सर्व ...

Filter Plan Visit from Former Student | माजी विद्याथ्र्याकडून फिल्टर प्लॅन भेट

माजी विद्याथ्र्याकडून फिल्टर प्लॅन भेट

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
प्रकाशा : शहादा तालुक्यातील प्रकाशा  येथील सर्वोदय विद्या मंदिरात 1992 मध्ये दहावीच्या वर्गात शिक्षण घेणारे सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनींचा स्नेहमिलन सोहळा झाला. विद्याथ्र्याना पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळावे यासाठी फिल्टर प्लॅन बसवून देण्याचा निर्णय या माजी विद्याथ्र्यानी या स्नेहमिलन मेळाव्यात घेतला.
सवरेदय विद्यामंदिरात 1992 मध्ये दहावीच्या बॅचमधील विद्यार्थी आज डॉक्टर, इंजिनीअर, वकील, ग्रामसेवक, उद्योजक, व्यापारी, शिक्षक, अधिकारी, शेतकरी आदी क्षेत्रात कार्यरत आहेत. या विद्याथ्र्यानी व्हाट्सअप ग्रुप तयार करून सोशल मीडियाच्या माध्यमातून एकत्र आले. त्यांनी नुकताच प्रकाशा येथील सद्गुरू धर्मशाळेमध्ये स्नेहमिलन सोहळा आयोजित केला. यामध्ये त्यांनी स्वत:चा परिचय करून देत कुटुंबाची माहिती, सध्या  कार्य करीत असलेली माहिती दिली. स्नेह भोजनाचा आस्वाद घेतला. 
या ग्रुपपने  सुमारे 55 हजार रुपये गोळा करून ज्या शाळेत आपण शिक्षण घेतले या शाळेतील विद्याथ्र्यासाठी शुद्ध पाणी मिळावे यासाठी त्यांनी फिल्टर प्लॅन बसवून देण्याचे ठरवले. महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश येथून हे सर्व विद्यार्थी एकत्र आले होते.  बालपणीच्या आठवणींना  उजाळा देत सर्वानी स्नेहभोजनाचा आनंद घेतला. 27 वर्षानंतर भेटल्याने एक वेगळाच आनंद त्यांना जाणवत होता. या सोहळ्यात प्रमोद पाटील, विजय पाटील, उमेश पाटील, जितेंद्र पाटील, अनिल पाटील, सुनील जावरे, शरद पवार, पुंडलिक शिंपी, राकेश गुरव, जयेश बागडे, विनय जैन, हिरालाल भोई, मीना पटेल, डॉ.स्मिता पाटील, चित्रा पाटील, वर्षा जोशी, संगीता पाटील, सविता पाटील, किर्ती ठाकणे, ज्योती पाटील, कल्पना पाटील आदींसह 45 विद्यार्थी एकत्र आले होते.
 

Web Title: Filter Plan Visit from Former Student

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.