शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
3
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
4
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
5
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
6
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
7
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
8
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
9
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
10
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
11
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
12
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
13
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
14
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
15
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
16
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
17
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
18
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
19
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
20
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
Daily Top 2Weekly Top 5

दुसरा विवाह करणा-या पतीविरोधात गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2021 12:53 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : पहिली पत्नी हयात असताना दुसरे लग्न करून पहिल्या पत्नीवर चरित्राच्या संशय घेऊन मारहाण करून ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : पहिली पत्नी हयात असताना दुसरे लग्न करून पहिल्या पत्नीवर चरित्राच्या संशय घेऊन मारहाण करून शारीरिक छळ करणाऱ्या पतीसह सासरच्या आठ जणांविरोधात शहादा पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.शहरातील स्वामीनारायण मंदिराजवळील माहेर असलेल्या योगिता प्रशांत चौधरी यांचा  विवाह एप्रिल २००८ मध्ये नांद्रा जि. जळगाव येथील प्रशांत सुरेश चौधरी यांच्यासोबत झाला होता.  या दोघांना एप्रिल २००९ मध्ये कन्यारत्न प्राप्त झाले होते. दरम्यान वेळोवेळी योगिता यांचा पती व सासरची मंडळी किरकोळ कारणातून छळ करत होते. तसेच चारित्र्यावर संशय घेऊन सतत मारहाण करत होते. दरम्यान २०१५ मध्ये मारहाण अधिक झाल्याने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यानंतर योगिता यांना घराबाहेर काढून देण्यात आले होते. या प्रकारानंतर विवाहिता ही माहेरी आली होती. याचा फायदा घेत प्रशांत चाैधरी याने गेल्या सात जानेवारी रोजी  सात  बिजासनी माता मंदिर येथे  बहादरपूर येथील युवतीशी विवाह केला होता. विवाहानंतर शहादा येथे येवून योगिता चाैधरी यांना मारहाण करत घटस्फोट देण्याचा दबाव टाकून मारहाण करण्यात आली होती. घटनेनंतर विवाहिता योगिता यांनी शहादा पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यांच्या फिर्यादीवरुन पती प्रशांत, सासरे सुरेश दामोदर चौधरी , सासू अलका तिघे रा. नांद्रा. जि.जळगाव, नणंद वैशाली विजय चौधरी, नंदोई विजय पितांबर चौधरी, भाचा प्रतीक चौधरी, तेजस चौधरी, सर्व रा. खेतिया (मध्यप्रदेश) व पती प्रशांत याची दुसरी पत्नी संगीता चौधरी रा. बहादरपूर ता. पारोळा  अशा आठ जणांविरुद्ध शहादा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक माया राजपूत करीत आहेत.नंदुरबारातील विवाहितेचाही छळ नंदुरबार शहरातील दुधाळे शिवारातील माहेर असलेल्या दिपांजली कमलेश माेहिते यांचा धुळे येथे शारिरिक व मानसिक छळ करण्यात आला. मे २०१५ पासून त्यांचा छळ सुरु होता. घरगुती कामांवरुन दिपांजली यांचा सासरचे छळ करत होते. त्यांनी माहेरी आल्यावर हा प्रकार कथन केला होता.  याप्रकरणी त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन पती कमलेश रमेश मोहिते, सासू सुमनबाई रमेश मोहिते व सासरे रमेश बारकू मोहिते सर्व रा. आदर्श नगर धुळे यांच्या विरोधात नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस नाईक जाधव करत आहेत.