शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
2
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
3
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
4
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
5
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
6
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
7
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
8
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
9
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
10
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
11
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
12
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
13
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
14
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
15
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
16
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
17
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
18
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
19
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
20
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्याला मारहाण करणाऱ्या पोलिसावर गुन्हा दाखल करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 12:39 IST

 लोकमत न्यूज नेटवर्क शहादा :  विनामास्क मोटारसायकल चालवत असल्याचे कारण सांगून शहादा पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक व वाहतूक पोलिसांनी अमानुषपणे ...

 लोकमत न्यूज नेटवर्कशहादा :  विनामास्क मोटारसायकल चालवत असल्याचे कारण सांगून शहादा पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक व वाहतूक पोलिसांनी अमानुषपणे मारहाण करत दुचाकीचालकास जखमी केल्याची घटना घडली. या घटनेमुळे अंतिम वर्ष कला शाखेचा शेवटचा पेपर देता आला नसल्याने दोषी पोलीस कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करून अटक करण्यात यावी, अन्यथा १५ डिसेंबरला प्रांताधिकारी कार्यालयावर संपूर्ण कुटुंब आमरण उपोषणास बसणार असल्याचा इशारा तालुक्यातील मामाचे मोहिदे येथील संजय पिंपळे यांनी दिला आहे. १९ नोव्हेंबर रोजी शहादा शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ विकास व त्याचे वडील संजय पिंपळे हे मोटारसायकलवर आले असता  वाहतूक पोलीस सचिन पाटील यांनी त्यांना थांबवले. तुम्ही चेहऱ्यावर मास्क लावला नसून, तुमच्यावर नियमानुसार कारवाई केली जाईल असे त्यांनी सांगितले. त्यानंतर दंडात्मक कारवाई करण्याऐवजी वाहतूक  पोलीस सचिन पाटील व उपनिरीक्षक कैलास माळी यांनी विकास पिंपळे यास पोलीस ठाण्यात नेऊन अमानुषपणे मारहाण केली. यात विकासच्या कानावर जोरदार फटके लागल्याने त्याच्या कानाला गंभीर दुखापत झालेली आहे. या मारहाणीत विकासाच्या कानाचा पडदा फाटला आहे. तसेच विकासच्या मोबाइलमधील डेटा डिलीट करून पोलिसांनी दोघांकडून ४०० रुपये दंडाची आकारणी केल्यानंतर दोघांना सोडून दिले. यावेळी विकासचा तृतीय वर्ष कला शाखेचा अंतिम पेपर असल्याने तो ऑनलाइन पेपर देणार होता. त्याचे हॉल तिकीट व ऑनलाइन रजिस्ट्रेशन मोबाइलमध्ये होते. मात्र पोलिसांनी सर्व डेटा डिलीट केल्याने तो पेपर देण्यापासून वंचित राहिला. परिणामी त्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांना वारंवार निवेदने देऊन योग्य ती कारवाई झाली नसल्याने दोषी पोलिसांवर गुन्हा दाखल झाला नसल्याने १५ डिसेंबर रोजी प्रांताधिकारी कार्यालयाजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ संजय पिंपळे, जखमी विकास पिंपळे व त्याची आई वंदना पिंपळे असे संपूर्ण पिंपळे कुटुंब आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा निवेदनाद्वारे कुटुंबाने दिला          आहे.