शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

कवठळ शिवारात शेताचा झाला नाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2019 12:24 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : गुरुवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास विजांच्या कडकडाटात पावसाने पुन्हा शहर व ग्रामीण भागाला झोडपून ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : गुरुवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास विजांच्या कडकडाटात पावसाने पुन्हा शहर व ग्रामीण भागाला झोडपून काढले. पपई व कापसाच्या शेतात पाणी शिरल्याने अनेक शेतक:यांच्या शेतातील पपईची झाडे उन्मळून पडली आहेत.  कवठळ शिवारातील एका शेतात नाल्याचे पाणी शिरल्याने या शेताला नाल्याचे स्वरुप प्राप्त झाले आहे.तालुक्यातील मामाचे मोहिदे गावालगत असलेल्या नाल्यावरील फरशी तुटल्याने वाहतूक गावातून वळविण्यात आली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने गेल्या आठवडय़ात थातूरमातूर काम केल्याने संबंधित कामाची चौकशी करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. गुरुवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास लोंढरे, जयनगर, वडछील, शोभानगर पुनर्वसन, डोंगरगाव, ससदे, मामाचे मोहिदे, सोनवद, सावळदा परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे अनेक शेतक:यांच्या शेतातील पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. बुधवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारासही जोरदार पाऊस झाला होता. बुधवार व गुरुवारच्या पावसामुळे शेतांना तलावाचे स्वरुप आले आहे. काही शेतक:यांच्या कापूस व पपई पिकाचे मोठे नुकसान झाले. कवठळ येथील अण्णा पाटील यांच्या चार एकर शेतात कहाटूळ गावाकडून येणा:या नाल्याचे पाणी शिरल्याने अक्षरश: नाला निर्माण झाल्याने संपूर्ण शेती नापिकी झाली आहे. मामाचे मोहिदे गावालगत असलेल्या जय  जवान जय किसान महाविद्यालयाला लागून असलेली फरशी 15 दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे फरशीचा काही भाग तुटून पडलेला होता. त्यानंतर त्याठिकाणी मुरूम टाकून तात्पुरती डागडूजी करण्यात आली होती. अवजड वाहनांची वाहतूक गावातून वळविण्यात आली होती. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या फरशीचे दुरुस्तीचे थातूरमातूर काम झाल्याने बुधवारी व गुरुवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे त्या फरशीवरील काँक्रिट रस्ता उखडून  नाल्यामध्ये वाहून गेल्याने त्याठिकाणी खड्डे पडलेले आहेत. पावसामुळे तालुक्यात अनेक ठिकाणी फरशी पूल तुटल्याने त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांनी केलेली आहेबुधवारी सायंकाळी व गुरुवारी दुपारी झालेल्या मुसळधार पावसाने शहादा शहर व तालुक्यातील ग्रामीण भागाला अक्षरश: झोडपून काढले. गुरुवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास लोंढरे, जयनगर, वडछील, शोभानगर पुनर्वसन, डोंगरगाव, ससदे, मामाचे मोहिदे, सोनवद, सावळदा परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे अनेक शेतांमध्ये पाणी साचल्याने तलावाचे स्वरुप निर्माण झाले आहे. काही शेतांमधील पपईची झाडे उन्मळून पडली आहेत.