शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
4
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
5
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
6
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
7
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
8
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
9
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
10
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
11
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
12
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
13
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
14
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
15
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
16
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
17
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
18
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
19
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
20
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
Daily Top 2Weekly Top 5

अक्कलकुवा तालुक्यात हिंस्र प्राण्यांचा संचार वाढल्याने जीवित हानीची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:19 IST

अक्कलकुवा तालुक्यामध्ये अक्कलकुवा, खापर, मोलगी, काठी, वडफळी ही पाच वनक्षेत्रे असून केवळ अक्कलकुवा या वनक्षेत्रातील काही भाग शहरी भागात ...

अक्कलकुवा तालुक्यामध्ये अक्कलकुवा, खापर, मोलगी, काठी, वडफळी ही पाच वनक्षेत्रे असून केवळ अक्कलकुवा या वनक्षेत्रातील काही भाग शहरी भागात मोडत असून तालुक्‍यातील सर्वच वनक्षेत्रांचा भाग हा सातपुड्याच्या वन क्षेत्रांमध्ये समाविष्ट आहे. या वनक्षेत्रांमध्ये वन्यप्राण्यांचा मुक्तसंचार अलीकडच्या काही वर्षांमध्ये वाढला आहे. पावसाळा सुरू झाला असल्याने सातपुड्यात जिकडे-तिकडे हिरवेगार झाल्यामुळे वन्यप्राण्यांचा मुक्तसंचार अधिक वाढला आहे. गेल्या आठवड्यात सातपुड्यातील डाब गावाच्या परिसरात भर दिवसा दोन अस्वले मुक्तपणे संचार करत असल्याचे दृश्य आढळले होते. या परिसरात शेतीमध्ये काम करणाऱ्या शेतकऱ्यांनी या अस्वलांना आरडाओरडा करून पळवून लावले होते. मात्र या वन्यप्राण्यांच्या मुक्तसंचारामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. तालुक्यातील पाचही वनक्षेत्रांमध्ये अस्वलांसह इतर हिंस्र प्राण्यांचा मुक्तसंचार अलीकडच्या काळात अधिक वाढल्यामुळे या परिसरात राहणाऱ्या नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. वनक्षेत्रामध्ये असलेला वन्यप्राण्यांचा मुक्तसंचार तसेच हिंस्र तसेच उपद्रवी प्राण्यांच्या संचाराबाबत वनक्षेत्रात कार्यरत असलेले अधिकारी व कर्मचारी यांनी वेळोवेळी नागरिकांना माहिती देण्याची व सावध करण्याची गरज असताना, या वनक्षेत्रातील अधिकारी व कर्मचारी वनक्षेत्रामध्ये आपल्या सोयीच्या वेळेनुसार केवळ नावापुरती हजेरी लावून आपले कर्तव्य पार पाडत असल्यामुळे तालुक्यातील नागरिकांना वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात नाहक वेळोवेळी जीव गमवावा लागला असून अनेकांना जायबंदी व्हावे लागले आहे. पावसाळ्यात या वनक्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर झाडेझुडपे तसेच जंगल वाढत असल्यामुळे या वनक्षेत्रामध्ये प्राण्यांसह उपद्रवी प्राण्यांचा देखील मोठ्या प्रमाणावर मुक्तसंचार सुरू होतो. या प्राण्यांची वेळोवेळी माहिती मिळवणे व परिसरातील नागरिकांना वन्यप्राण्यांना याबाबत माहिती देऊन त्यापासून सुरक्षिततेचे उपाय करणे याबाबत वन अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून वेळोवेळी मार्गदर्शन होणे आवश्यक असताना, ते होताना दिसत नसल्यामुळे या वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात नागरिकांना नाहक बळी पडावे लागते. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी देखील लक्ष देण्याची गरज आहे. तालुक्यातील वनक्षेत्रांमध्ये आजही वनांची कत्तल केली जात असताना तालुक्यात वन अधिकाऱ्यांमार्फत योग्य कारवाई होताना दिसत नाही. तालुक्यामध्ये लाकूड तस्करी मोठ्या प्रमाणावर होत असताना देखील याबाबत संबंधित वनपरिक्षेत्र अधिकारी व कर्मचाऱ्यांनी महाभारतातील धृतराष्ट्राची भूमिका घेतली आहे. ही भूमिका साकारण्यासाठी त्यांना मोबदला तर मिळत नाही ना, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तालुक्यातील काही वनक्षेत्र अधिकारी कारवाई करतात, मात्र ती कारवाई गुलदस्त्यातच असते. केलेल्या कारवाईबाबत संबंधित वनक्षेत्र अधिकारी माहिती देण्यासाठी टाळाटाळ करीत असून कारवाईची माहिती लपवण्यासाठी अधिक कटाक्ष बाळगत असल्यामुळे तालुक्यातील वनक्षेत्राच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.