शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: ५ राज्यांमध्ये 'सत्ता'धीश कोण?, आज होणार फैसला; पश्चिम बंगालकडे सगळ्यांचे लक्ष
2
राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार?
3
पश्चिम बंगालमधील या दोन मतदारसंघात 'कांटे की टक्कर', निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष
4
आजचे राशीभविष्य, ०४ मे २०२६: मिथुन, वृश्चिक, मकर राशींना धनलाभाचे संकेत; कसा असेल तुमचा दिवस?
5
पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा
6
पाऊस चोरणारे देश? अमेरिका-इस्रायलवर 'ढगचोरी'चा खळबळजनक आरोप; प्रकरण काय?
7
राज्यात पहिलीपासून तिसऱ्या भाषेचा मुद्दा यंदाच्या वर्षी बारगळण्याची चिन्हे; डॉ. नरेंद्र जाधव समितीच्या अहवालावर निर्णय प्रलंबित
8
आधी नराधमाला फाशी द्या, मगच या...नसरापूरच्या पीडित पित्याचा संताप, न्यायाची केली मागणी; राजकीय नेत्यांच्या गर्दीने कुटुंब व्यथित
9
पाकिस्तान, चीन सीमेवर भारताची अहोरात्र ‘दृष्टी’; ‘गॅलेक्सआय’ या भारतीय स्टार्टअपचा उपग्रह लाँच
10
एसीच्या स्फोटाने आग; दिल्लीत ९ जणांचा मृत्यू; जळालेल्या आईच्या मिठीत होता मुलाचा मृतदेह
11
परीक्षा नव्हे, बोर्डच ‘नॉमिनल’ ! निकालात उच्चांक गाठणारे बोर्ड आता का मागे पडले?
12
मिसिंग लिंकवर सेल्फीसाठी थांबलात तर होईल मोठा ताप; वाहतूक पोलिसांकडून दाेन दिवसांत ९० वाहनांवर दंडात्मक कारवाई
13
या रक्तरंजित काळात कोहिनूरची आठवण का व्हावी?
14
कामगारांचा संताप आता रस्त्यावर उतरू लागला आहे, कारण..
15
सॉल्टलँड, परप्रांतीय आणि कॉन्स्टेबलचा मृत्यू..!
16
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
17
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
18
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
19
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
20
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
Daily Top 2Weekly Top 5

बंधाऱ्याच्या अपूर्ण कामामुळे पिकांच्या नुकसानीची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2020 12:03 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ब्राह्मणपुरी : शहादा तालुक्यातील भागापूर शिवारातील सुखनाई नदीवर बांधण्यात येणाऱ्या केटीवेअर बंधाºयाचे काम अपूर्ण असल्याने पुराचे ...

लोकमत न्यूज नेटवर्कब्राह्मणपुरी : शहादा तालुक्यातील भागापूर शिवारातील सुखनाई नदीवर बांधण्यात येणाऱ्या केटीवेअर बंधाºयाचे काम अपूर्ण असल्याने पुराचे पाणी शेतात शिरुन नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांकडून वर्तवली जात आहे. बंधाºयाच्या कामासाठी मोठा खड्डा खोदण्यात आल्याने मातीचा भराव झाला असून संबंधित विभागाने याबाबत उपाययोजना करण्याची मागणी शेतकºयांकडून होत आहे.सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातून वाहणारी सुखनाई नदी पावसाळ्यात दुथडी भरून वाहते. या नदीवर नादुरुस्त कोल्हापुरी बंधारा असल्याने पावसाचे पाणी वाहूून जात होते. त्यामुळे या पाण्याचा शेतकºयांना उपयोग होत नाही. या अनुषंगाने शासनाकडून सुखनाई नदीवर केटीवेअर बंधारा बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. हा बंधारा बांधकामासाठी नदीत मोठा खड्डाही खोदण्यात आला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कामे बंद झाल्याने हे कामही बंद पडले. परंतु सध्या लॉकडाऊनमध्ये शिथीलता आणून बांधकामे सुरू झाली आहेत. त्यामुळे या बंधाºयाच्या कामालाही सुरुवात होणे अपेक्षित होते. मात्र हे काम बंदच आहे.बंधाºयासाठी खोदकामातून निघालेली माती नदीत पडून असल्याने पुराचे पाणी शेतात जाऊन पिकांचे नुकसान होण्याची भीती शेतकºयांकडून व्यक्त केली जात आहे. या बंधाºयाचे काम त्वरित सुरू करावे यासाठी शेतकºयांनी वारंवार संबंधित ठेकेदार व अधिकाºयांना सांगितले. परंतु त्यांच्याकडून दुर्लक्ष होत असल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. नदीला आलेल्या पुराचे पाणी शेतात शिरुन होणाºया नुकसानीला जबाबदार कोण राहील? असा प्रश्नही शेतकºयांकडून उपस्थित होत आहे. या बंधाºयाच्या बांधकामानजीक अंबालाल पाटील, काशीनाथ पाटील, छायाबाई पाटील, सुरेखाबाई पाटील, दिनेश पाटील, रमेश पाटील, सरलाबाई पाटील, उमेश पाटील, प्रल्हाद पाटील, रेखाबाई पाटील यांच्या मालकीचे शेत असून पुराचे पाणी शेतात शिरुन मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. संबधित विभागाच्या अधिकाºयांनी या समस्येकडे लक्ष घालून उपाययोजना करून शेतपिकांचे होणारे संभाव्य नुकसान टाळावे, अशी मागणी या बंधाºयाच्या कामालगत शेती असलेल्या शेतकºयांकडून होत आहे.

सुखनाई नदीत सुरू असलेले बंधाऱ्याचे काम गेल्या पाच महिन्यापासून बंद ठेवण्यात आले आहे. पावसाळा सुरू झाला असून नदीला पूर आला तर मातीच्या ढीगामुळे पाणी शेतात वळेल व पिकांचे नुकसान होऊ शकते. संबंधित ठेकेदाराने लवकरात लवकर बंधाऱ्यांचे काम सुरू करावे.-अंबालाल काशीनाथ पाटील, शेतकरी, ब्राह्मणपुरी (भागापूर शिवार).