कामांची रक्कम मिळण्यासाठी उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:28 IST2021-03-24T04:28:35+5:302021-03-24T04:28:35+5:30

कुकडीपादर ग्रामपंचायत अंतर्गत २०१७-१८ मध्ये ठक्कर बाप्पा वस्ती सुधारणा योजनेतून चापडी, सामजीकुंडपाडा, माथाचापडी व केवडीचा निपटीपादरपाडा येथे झालेल्या चार ...

Fasting to get the amount of work | कामांची रक्कम मिळण्यासाठी उपोषण

कामांची रक्कम मिळण्यासाठी उपोषण

कुकडीपादर ग्रामपंचायत अंतर्गत २०१७-१८ मध्ये ठक्कर बाप्पा वस्ती सुधारणा योजनेतून चापडी, सामजीकुंडपाडा, माथाचापडी व केवडीचा निपटीपादरपाडा येथे झालेल्या चार सोलर पंप कामाचे १४ लाख आठ हजार ६९६, पाणीटंचाई निवारणार्थ चापडीचा हुरदीपाडा, माथाचापडी, उकलापाडा, ओलीपाडा, वाहीपाडा, केवडीचा निकटीपाडी, दरपाडा, गेमपाडा, केवडापाडा, गोमाईपाडा, पिपरीपाडा येथील १० हातपंपांचे पाच लाख ४४ हजार १८० व चापडी पाटीलपाडा ते वावीपाडा, अरेढी पाटीलपाडा ते बोरविहीपाडा, कुकडीपादर कारभारीपाडा ते केवडीचा गमाईपाडा ते घोडापादरपाडा, कुकडीपादर बारीपाडा ते उमराईपाडा, पांढरामाती पुजारापाडा ते जाबांपाणीपाडा या सहा रस्त्यांच्या खडीकरण व मातीकरण कामाचे २३ लाख दोन हजार अशी एकूण तिन्ही कामांचे ४२ लाख ५४ हजार ८७६ रुपये थकीत रक्कम अद्यापपर्यंत मिळालेली नाही. या कामांची रक्कम मिळण्यासाठी अनेक वेळा चकरा मारूनही रक्कम मिळालेली नाही. ही रक्कम मिळावी, यासाठी कुकडी पादरचे माजी सरपंच सांगल्या बाज्या वसावे हे २४ मार्च रोजी सकाळी ११ वाजता अक्कलकुवा येथील तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसणार आहेत. त्याबाबतचे निवेदन त्यांनी दिले आहे. हे निवेदन वसावे यांनी जिल्हाधिकारी, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रकल्प अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, पोलीस निरीक्षक यांनाही पाठिवले आहे.

Web Title: Fasting to get the amount of work