शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
3
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
4
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
5
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
6
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
7
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
8
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
9
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
10
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
11
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
12
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
13
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
14
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
15
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
16
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
17
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
18
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
19
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
20
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
Daily Top 2Weekly Top 5

पाऊस हुलकावणी देत निघून जात असल्याने शेतकरी चिंतीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:19 IST

शेतकरी या हंगामात चांगल्या पावसाच्या प्रतीक्षेत असताना यंदा ही पावसाने पाहीजे तशी या परिसरात साथ दिली नाही. मृग बेभरवशाचा ...

शेतकरी या हंगामात चांगल्या पावसाच्या प्रतीक्षेत असताना यंदा ही पावसाने पाहीजे तशी या परिसरात साथ दिली नाही. मृग बेभरवशाचा गेल्याने शेतकऱ्यांची मदार आद्र नक्षत्रावर होती. मात्र, या नक्षत्रात दमदार पाऊस आला नाही. त्यानंतर सूर्याचा पुनर्वसू नक्षत्राचे वाहन उंदीर असल्याने पाऊस पडेल, अशी आशा होती. मात्र, या तिन्ही नक्षत्रात पाऊस बरसला नाही. त्यामुळे दुबार तर काही ठिकाणी तिबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांवर ओढवले आहे. सोमवारपासून सूर्याचा पुष्य नक्षत्रात प्रवेश झाला आहे. या नक्षत्राचे वाहन घोडा असून, या घोड्यावर शेतकऱ्यांची मदार आहे. घोडा जर जोरात धावला नाही तर शेतकऱ्यांना उत्पन्नाचा जबर फटका बसल्याशिवाय राहणार नाही. हे मात्र नक्कीच.

कमी पाऊसामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट कोसळले आहे.

महागडे बियाणे व खते वाया जात असल्याने शेतकरी हवालदिल झालेले आहेत. कापसाची मोड करून त्या जागेवर सोयाबीनची पेरणी केली. परंतु कमी पाऊसामुळे उगवन क्षमता नसल्याने सोयाबीन पीकही मोडणीवर आले आहे. मे-जूनमध्ये कापसाची लागवड केली होती. ही पिके डौलदार असल्याने पीक शेतकऱ्यांना खुणावत आहे. परंतु समाधानकारक पाऊस पडत नसल्याने पुढे हे पीक टिकेल की नाही याचा भरवसा नाही, पाऊस दमदार आला नसल्याने नाले भरून गेले नाहीत, जमीन ओलीत असल्यासारखा पाऊस असल्याने कापसाचे पीक बहरलीत, मात्र पिकांना बहर, फुले, फळे येण्याकरिता जमिनीत ओलावा असणे आवश्यक आहे. त्यामुळे आता पुष्य नक्षत्रावर शेतकऱ्यांचा भरोसा असून, या नक्षत्रात दमदार पाऊस आल्यास शेतातील पिके वाचतील, अशी आशा शेतकरी व्यक्त करीत आहे.

दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

तापी, गोमाई काठासह परिसरात जून व जुलै महिना संपण्यात आला तरी अजून दमदार पाऊस बरसलेला नाही. त्यामुळे खरीप हंगामात शेतकऱ्यांनी पेरणी केलेले कापूस, मूग, उडीद, सोयाबीन आदी पिके मोड आलेली आहेत, दुबार पेरणी करूनही पाऊस आलेला नाही. त्यामुळे तिबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांवर ओढवलेले आहे. मशागत, महागडे बियाणे, खते, कीटकनाशके यांचा खर्च वाया गेलेला आहे. त्यामुळे शासनाने नंदुरबार जिल्ह्यासह तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.