शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

कृषी विभागाने लागवड केेलेल्या फळझाडांचे उत्पन्न घेणार शेतकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:31 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कृषी विभागाने गेल्या वर्षात जिल्ह्यातील ३६ महसुली मंडळात एक हजार ८०० हेक्टर क्षेत्रात फळझाडांची ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नंदुरबार : कृषी विभागाने गेल्या वर्षात जिल्ह्यातील ३६ महसुली मंडळात एक हजार ८०० हेक्टर क्षेत्रात फळझाडांची लागवड केली होती. ही झाडे सुस्थितीत असून, त्यांची वाढही झाली आहे. कृषी विभागाने संगोपन करून वाढवलेल्या या झाडांची देखभाल यापुढेही कृषी विभाग करणार असून, त्याची फळे मात्र शेतकऱ्यांना मिळणार आहे. जिल्हा अधीक्षक कृषी विभागाकडून हा प्रयोग राबवला जात आहे. जिल्ह्यातील ८६ टक्के फळझाडे लागवडीच्या वर्षभरानंतर चांगल्या स्थितीत असल्याची माहिती विभागाने दिली आहे.

३३ कोटी वृक्ष लागवड उपक्रमांतर्गत कृषी विभागाने एक लाख ७४ हजार ६४८ झाडांची लागवड २०१९ मध्ये केली होती. विविध भागात लागवड केलेल्या या झाडांचे संगोपन त्या त्या मंडळात नियुक्त कृषी सहायकांमार्फत करून घेण्यात आले होते. यातील ७० टक्के झाडे ही जगली असून, त्यांची उंची ही सात ते आठ फुटांपेक्षा अधिक वाढली आहेत. गेल्या वर्षात जिल्ह्याला ३९ हजार झाडे लागवडीचे ध्येय होते. परंतु यावर जात कृषी विभागाने एक हजार ८०० हेक्टरमध्ये ४० हजारांपेक्षा अधिक झाडांची लागवड केली होती. ही झाडे प्रामुख्याने वार्षिक व उत्पादन देणाऱ्या फळांची आहेत. येत्या पाच वर्षानंतर ही झाडे उत्पादन देण्यास सक्षम असतील.

जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात कृषी विभाग साधारण दोन हजारपेक्षा अधिक हेक्टरवर फळझाडांची लागवड करून त्यांचे संगोपन करणार आहे. कालांतराने ही झाडे शेतकऱ्यांना सोपवली जातील. जिल्ह्याने गेल्यावर्षी लागवड क्षेत्रात नाशिक विभागातून आघाडी घेतली होती. यामुळे यंदाही दोन हजार किंवा त्यापेक्षा अधिक क्षेत्रात आघाडी घेतली जाण्याचा मानस व्यक्त करण्यात आला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी दुर्गम भागात भेट देत धडगाव येथील रोपवाटिकेची पाहणी केली होती. यावेळी त्यांनी कृषी विभागाला सीडबाॅल संकल्पना राबविण्याचे सूचित केले होते. या संकल्पेनुसारही कामकाज करण्याची तयारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या कार्यालयाकडून सुरू झाली आहे. त्यानुसार कामकाज होणार आहे. तूर्तास सर्व ३६ रोपवाटिकांमध्ये फळझाडांची लागवड वाढवण्यात आली आहे.

गेल्यावर्षीप्रमाणे प्रत्येकी सहा हेक्टर क्षेत्रानुसार वृक्ष लागवड सुरू होणार आहे. एकूण २२८ कृषी सहाय्यकांच्या माध्यमातून जिल्ह्यात ही लागवड होणार आहे.

गेल्या वर्षात एक हजार ८०० हेक्टरवर लागवड केलेली फळझाडे ही चांगल्या स्थितीत आहेत. त्यांचे संगोपन चांगल्या प्रकारे झाल्याने वाढ झाली आहे. या झाडांची फळे ही त्या त्या भागातील शेतकऱ्यांना दिली जातील. यातून रोजगार मिळू शकतो. यंदाही जिल्ह्याच्या विविध भागात वृक्ष लागवड करण्याची तयारी आहे. विशेषकरून फळ झाडांवर लक्ष राहील. कृषी सहाय्यकांच्या माध्यमातून ही फळ झाडे जिल्ह्याच्या विविध भागात लागवड करण्याचा प्रयत्न राहणार आहे.

-अनंतराव पोटे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, नंदुरबार