शहरं
Join us  
Trending Stories
1
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
2
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
3
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
4
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
5
मुकेश अंबानींच्या Reliance ने इतिहास रचला; असा कारनामा करणारी देशातील पहिली कंपनी...
6
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
7
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
8
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
9
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
10
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
11
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
12
IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक
13
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
14
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
15
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
16
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
17
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
18
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
19
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
20
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
Daily Top 2Weekly Top 5

खेडा खरेदीत शेतक:यांची लूटमार सुरुच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2019 12:48 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : खेडा कापूस खरेदीत व्यापारी शेतक:यांना नाडत असून अवघा 4700 ते 4900 रुपये क्विंटल भाव ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : खेडा कापूस खरेदीत व्यापारी शेतक:यांना नाडत असून अवघा 4700 ते 4900 रुपये क्विंटल भाव देत आहे. याशिवाय मोजणीची पद्धतही सदोष राहत असल्यामुळे शेतक:यांचे मोठे नुकसान होत आहे. दुसरीकडे  बाजार समितीतर्फे सुरू करण्यात आलेल्या खरेदी केंद्राकडे देखील शेतकरी वळू लागले आहेत. येथे भाव 5100 ते 5400 र्पयत मिळत आहे. शिवाय थेट बँक खात्यात रक्कम जमा होत असल्यामुळे शेतक:यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. कापूस खरेदीला सध्या ग्रामीण भागात जोर आला आहे. वातावरणातील आद्रता कमी झाली आहे. जो कापूस पावसात ओला झाला होता तो आता सुकविला गेला आहे. त्यामुळे कापसातील ओलावा ही खरेदीदारांकडून होणारी ओरड कमी झाली आहे. परिणामी शेतक:यांच्या कापसाला आता ब:यापैकी भाव मिळू लागला आहे. परंतु अनेक शेतकरी हे खेडा खरेदीला प्राधान्य देत असल्यामुळे शेतकरी त्यात नाडला जात आहे. त्यामुळे बाजार समितीच्या कापूस खरेदी केंद्रास आणि सीसीआयच्या खरेदी केंद्राला पसंती दिली जात आहे. खेडा खरेदीत लुटमारजिल्ह्यात यंदा कापसाचे क्षेत्र जवळपास एक लाख हेक्टर्पयत होते. परंतु सततचा पाऊस, काही वेळा अतिवृष्टी यामुळे कापूस पिकाला फटका बसला. जेमतेम जे उत्पादन हाती येत होते त्यातही अवकाळी पावसाने कापूस खराब केला. परिणामी कापूस उत्पादन यंदा घटले आहे. असे असले तरी ज्या शेतक:यांना योग्य नियोजन करून कापूस पीक घेतले त्यांना चांगले उत्पादन आले आहे. सध्या कापूस विक्री जोमाने सुरू आहे. मात्र काही शेतकरी नंदुरबारातील खरेदी केंद्रात येण्यास कंटाळा करून गावात येणा:या कापूस व्यापा:यालाच तो विक्री करीत असल्याचे चित्र आहे. खेडा खरेदीतील व्यापारी मात्र अतिशय कमी भाव देत आहेत. खरेदी केंद्राच्या तुलनेत कमी भाव मिळूनही शेतकरी वाहतुकीचा ताण नको आणि लिलावाची प्रतिक्षा नको म्हणून स्थानिक स्तरावरच आलेल्या व्यापा:यांना कापूस विक्री करून मोकळे होत आहेत. परंतु त्यात शेतकरी नाडला जात असल्याचे दिसून येत आहे.बाजार समिती व सीसीआयबाजार समितीच्या खरेदी केंद्रात सध्या चांगली आवक होत आहे. सीसीआयने देखील जोमाने कापूस खरेदी सुरू केली आहे. कापसातील ओलाव्याच्या कारणावरून शेतक:यांनी या केंद्राकडे पाठ फिरविली होती. परंतु आता ओलावा कमी झाल्याने आता सीसीआयने देखील काही बाबी शिथील केल्याने शेतक:यांचा प्रतिसाद वाढत आहे. या ठिकाणी 5100 ते 5400 रुपये क्विंटल कापूस भाव मिळत आहे. थेट बँकेत पैसे जमाखरेदी केंद्रात कापूस विक्री केल्यानंतर थेट शेतक:यांच्या खात्यात पैसे जमा केले जात आहे. त्यामुळे पैशांची सुरक्षितता देखील असते. कापूस विक्रीला आणतांना शेतक:यांनी सातबारा उतारा, आधार कार्ड आणि बँक पासबूक यांची ङोरॉक्स आणल्यावर शेतक:यांच्या कापसाची लागलीच मोजमाप होऊन प्रतवारीनुसार भाव दिला जात असल्याचे बाजार समितीचे सचिव योगेश अमृतकर यांनी सांगितले.