शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

भुसार मालाची शासकीय खरेदी नसल्याने शेतकरी अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:31 IST

शहादा तालुका खरेदी-विक्री सहकारी संघात ३० एप्रिलपर्यंत शेकडो शेतकऱ्यांनी नाव नोंदवली गेली आहेत. त्यांची धान्य खरेदी झाली नाही व ...

शहादा तालुका खरेदी-विक्री सहकारी संघात ३० एप्रिलपर्यंत शेकडो शेतकऱ्यांनी नाव नोंदवली गेली आहेत. त्यांची धान्य खरेदी झाली नाही व ज्यांचे नाव नोंदणी बाकी आहे ते तर या प्रक्रिये पासून खूपच लांब आहेत. त्यामुळे प्रक्रियेला गती देऊन प्रत्यक्ष खरेदी करण्यात यावी. रब्बी ज्वारी (दादर)चे उत्पन्न आलेल्या शेतकऱ्यांची व्यथा अशी आहे की, कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये ज्वारीला भाव फारच कमी आहे. शासकिय किंमत दोन हजार ६०० रुपये प्रती क्विटंल जाहीर केली आहे. परंतु खरेदी बंद आहे, त्याचा फायदा घेत खाजगी व्यापारी खेडा पद्धतीने एक हजार ६०० ते एक हजार ७०० रुपये भावाने ज्वारी खरेदी करीत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. तसेच काही शेतकऱ्यांना माल भरण्यासाठी स्वतःचे गोडाऊन नसल्यामुळे मिळेल त्या भावाने माल विकावा लागत आहे. तरी शासकीय भुसार धान्य खरेदी केंद्रामार्फत पावसाळ्याआधी शासकीय खरेदी सुरु झाली तर शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकेल. रब्बी ज्वारी, मका, बाजरी आदींची खरेदी तातडीने करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

शहादा तालुक्यातील बहुसंख्य शेतकऱ्यांनी खरेदी-विक्री संघात जाऊन तीन महिन्यापूर्वी शासकीय भुसार माल खरेदी योजनेत नाव नोंदणी केली आहे. परंतु अद्यापपोवेतो शासकीय खरेदी कुठलीही हालचाल शासन स्तरावरून दिसत नाही. पावसाळ्याच्या आधी खरेदी केंद्र सुरु करण्यात यावे. याकामी शहादा तहसीलदारांनी त्वरित लक्ष देऊन शेतकऱ्यांच्या समस्या सोडवाव्यात.

-हरी दत्तू पाटील, भाजप पदाधिकारी व शेतकरी, प्रकाशा

लोकमत न्यूज नेटवर्क. तळोदा, तालुक्यातील रेवानगर ग्राम पंचायतीच्या मासिक सभेत बाहेरील व्यक्ती बेकायदेशीर पने उपस्थित राहून कामकाजात हस्तक्षेप करतात. याला सरपंच व ग्रामसेवक देखील जबाबदार असून या उलट विरोधी ग्राम पंचायत सदस्या स अपमानास्पद वागणूक देतात त्यामुळे बाहेरील हस्तक्षेप थांबविण्याची मागणी पंचायत समिती सदस्य,ग्राम पंचायत सदस्यांनी केली आहे.अन्यथा या विरोधात आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे. तळोदा तालुक्यातील रेवनगार ग्रांचांचायातीच्या सत्ते बाहेरील जास्तीच्या हस्तक्षेप बाबत पंचायत समिती सदस्य दाज्या पावरा व ग्राम पंचायत सदस्य तेहरसिंग पावरा यांनी तहसीलदार गिरीश वाखारे यांचा कडे लेखी तक्रार केली आहे.त्यात म्हटले आहे की,ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत सदस्यांना न बसवता सर्ते बाहेरील कार्यकर्त्यांना बसवितात.एवढेच नव्हे कामकाजात भाग घेवून ढवळाढवळ देखील करतात.शिवाय बेकायदेशीर कामे करण्यास भाग पडतात.याचे सरपंच व ग्रामसेवक अवलोकन करीत नाही म्हणजेच त्यांची एकप्रकारे मुक समतीच आहे.विविध विषयांवर हेच व्यक्ती मध्यस्थी करतात. दि १८ मे चया पार पडलेल्या सभेत ग्राम पंचायत सदस्य तेहरासिंग यांनी आपल्या प्रभागातील विविध समस्या व अडचणी लेखी स्वरूपात सादर केल्या होत्या. परंतू सदस्य नसलेले चीमा पावरा, नाथ्या पावरा, डेमशा पावरा यांनी त्याची खिल्ली उडविली.तुम्ही कितीही अर्ज द्या,तुमचे कामे होवू देणार नाहीत असे म्हणून अपमानास्पद वागणूक दिली होती.यावर सरपंचाने काहीच दखल घेतली नाही.असा आरोप त्यांनी केला आहे. कोरोना बाबत गावातील लोकांमध्य नकारात्मकता आहे.त्यावर जनजागृती केली जात नाही.शिवाय गावातील बहुसंख्य हात पंप नादुरुस्त झाले आहे.त्यामुळे पाणी टंचाई देखील निर्माण झाली आहे.महामारी मुळे ग्राम सभा झालेली नाही.मागील चार पाच महिन्यात मासिक सभा झालेल्या आहेत.त्या सभांमध्ये सदस्य नसलेल्यांना बसविण्यात येत आहे. अशा बेकायदेशीर प्रकाराला कायम स्वरुपी आळा घालावा. अशी मागणी पंचायत समिती सदस्य दाज्या पावरा,टेहरसिंग पावरा,पिंटू पावरा,दुरशा पावरा,बारक्या पावरा, लेहाऱ्या पावरा,मिनेश पावरा,रुमाल्या पावरा यांनी केली आहे.

फोटो,तहसीलदार वाखारे याना निवेदन देताना डाज्या पावरा,तहरसिंग पावरा,पिंटू पावरा