शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
3
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
4
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
5
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
6
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
7
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
8
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
9
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
10
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
11
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
12
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
13
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
14
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
15
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
16
खारेगाव टोलनाक्यावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत भांडुपमधील दाम्पत्याचा जागीच मृत्यू
17
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
18
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
19
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
20
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

मोड येथील शेतकऱ्यांचा 17 एकर ऊस जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 15:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क बोरद :  तळोदा तालुक्यातील आष्टे शिवारातील सर्व्हे नंबर ८/१, सात एकर, ८/२ मध्ये पाच एकर तर ...

लोकमत न्यूज नेटवर्कबोरद :  तळोदा तालुक्यातील आष्टे शिवारातील सर्व्हे नंबर ८/१, सात एकर, ८/२ मध्ये पाच एकर तर ९/२ मधील पाच एकर, असा एकूण १७ एकर ऊस व ठिबक सिंचनच्या नळ्या जाळल्याने संबंधित शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची घटना २१ रोजी रात्री घडली. या घटनेमुळे परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, या भागात संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी गस्त वाढवून अशा अज्ञात माथेफिरूंचा त्वरित बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.                      याबाबत असे की, २१ रोजी आष्टे शिवारातील ऊस पिकास आग लागल्याचे चित्र तरुणांना दिसताच त्यांनी तत्काळ घटनास्थळी दाखल होत आग विझविण्यासाठी अतोनात प्रयत्न केले. परंतु त्याचा काहीही उपयोग झाला नाही. या घटनेबाबत मोड येथील शेतकरी रेखाबाई भरत चौधरी व लीलाबाई पाटील यांनी सातपुडा साखर कारखान्याचे एम.डी. पी.आर. पाटील यांना या घटनेची माहिती दिली असता त्यांनी तत्काळ कृषी अधिकारी सावन पाटील, मोड केंद्रातील जाधव पाटील व भरत पाटील यांना घटनास्थळी पाठवून नुकसानीचा पंचनामा केला. या वेळी त्यांनी जळालेल्या उसाची तोड करण्याकरिता मजुरांच्या तीन टोळ्या आणून तत्काळ उसाची तोड सुरू केली आहे. दरम्यान या उसाची संबंधित शेतकऱ्यांनी साखर कारखान्याकडे नोंद केली होती. त्यामुळे त्याची तत्काळ तोड सुरू करण्यात आल्याचेही सांगण्यात आले. तसेच संजय शिंदे यांनी त्यांच्या उसाची नोंद पुष्पदंतेश्वर कारखान्यात केली असल्याने पुष्पदंतेश्वर कारखान्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही शिंदे यांच्या शेतातील उसाचा पंचनामा केला असून, त्यांच्याही उसाची लवकरच तोड करण्यात येणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले. दरम्यान, कारखान्याच्या नियमानुसारच संबंधित शेतकऱ्यांना पेमेंट मिळणार असल्याचेही सांगण्यात आले. या आगीच्या घटनेमुळे रेखाबाई भरत चौधरी व लीलाबाई भरत पाटील व संजय डाेंगर शिंदे या शेतकऱ्यांना नुकसानीस सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी तळोदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नंदराज पाटील यांनी या घटनेकडे गांभीर्याने लक्ष देऊन अशा माथेफिरूंचा त्वरित बंदोबस्त करावा व रात्रीच्या वेळेस परिसरातील शेतशिवारात गस्त वाढविण्याची मागणी केली आहे.