शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

शेतक:यांच्या बांधावर वनविभाग देणार बांबूची झाडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2019 12:35 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : शेतक:यांना शेतीसोबतच इतरही शेतीपूरक उद्योगातून लाभ मिळावा यासाठी वनविभाग पुढे सरसावला असून जिल्ह्यातील सुमारे ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : शेतक:यांना शेतीसोबतच इतरही शेतीपूरक उद्योगातून लाभ मिळावा यासाठी वनविभाग पुढे सरसावला असून जिल्ह्यातील सुमारे 3 लाख हेक्टर पेरणी योग्य क्षेत्रासाठी बांबू रोपे उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेण्यात आला आह़े यासाठी मेवासी आणि नंदुरबार वनक्षेत्रांतर्गत कारवाई सुरु करण्यात आली आह़े              वनविभागाच्या अटल बांबू समृद्धी योजनेंतर्गत हा उपक्रम राबवला जाणार असून शेतक:यांना लाभदायी ठरले अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आह़े या योजनेंतर्गत शेतजमिन आणि शेतबांधावर  ही रोपे उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत़ यासाठी जिल्ह्यातील वनविभागाच्या 36 रोपवाटिकांमध्ये बांबू लागवडीचे प्रयोग सुरु असल्याची माहिती देण्यात आली आह़े येत्या काही दिवसात या योजनेत सहभाग नोंदवणा:या शेतक:यांच्या शेतात बांबू रोपे मागणीनुसार पोहोचवली जाणार आहेत़ बांबू हे एक बहुपयोगी वनउपज असून आर्थिकदृष्टय़ा अत्यंत महत्त्वाचे असल्याने त्यास हिरवे सोने असेही संबोधले जात़े लाकूड विषयक गरजा पूर्ण करण्याकरिता सहज उपलब्ध ठरणारा व परवडणारा असल्याने त्याच्या खरेदी विक्रीचा मोठा उद्योग आह़े हा उद्योग जिल्ह्यातील शेतक:यांना माहिती पडावा यासाठी वनविभागाने हा उपक्रम हाती घेतला आह़े याअंतर्गत योजनेत सहभाग घेणा:या शेतक:यांना पूर्णपणे प्रशिक्षण देऊन बांबूचे फायदे व माहिती देण्यात येणार असल्याचे वनविभागाने म्हटले आह़े नंदुरबार जिल्ह्यात राबवल्या जाणा:या  उपक्रमासाठी उपवनसंरक्षक एस़बी़केवटे, सहायक वनसंरक्षक ई़बी़चौधरी यांच्यासह जिल्ह्यातील वनविभागाचे अधिकारी परिश्रम घेत आहेत़  

4बांबू लागवडीकरीता शेतक:यांना टिश्यू कल्चर बांबू रोपांचा पुरवठा केला जाणार असल्याची माहिती आह़े या रोपांची निर्मिती ही वनविभागाच्या जिल्ह्यातील विविध रोपवाटिकांमध्ये होणार आह़े शेतक:यांच्या मागणीनुसार आलेल्या अनुदानातून ही रोपे दिली जाणार आहेत़ उत्तम गुणधर्म असलेल्या रोपांची निर्मिती जिल्ह्यातच करुन योजना राबवण्याचे उद्दीष्टय़ विभागाने ठेवले आह़े यात त्यांना यश येईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आह़े शेतजमिनीवर लागवड होणा:या या बांबू रोपांची सुरुवातीच्या काळात योग्य पद्धतीने वाढ व्हावी म्हणून वनविभाग शेतक:यांना मार्गदर्शन करणार आह़े निर्मिती झालेल्या बांबूचे उत्पादन येण्यास बराच कालावधी लागणार असल्याने अद्याप पूरक उद्योगांना बांबू विक्रीबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही़ या उपक्रमाचा शेतजमिनीला सर्वाधिक लाभ होणार असल्याचे सांगण्यात आले आह़े बांधावर लावलेले बांबू झाड जमिनीची धूप होण्यापासून वाचवून पाण्याचा स्त्रोतही जिवंत ठेवू शकतात़ सर्व सहा तालुक्यातील शेतक:यांनी वनविभागाच्या तालुकानिहाय कार्यालयात संपर्क केल्यानंतर नोंदणी करुन त्यांना झाडे उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत़ पहिल्या टप्प्यात किमान दोन लाख बांबू रोपे लावली जाणार असल्याची माहिती आह़े