शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
2
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
3
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
4
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
5
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
6
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
7
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
8
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
9
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
10
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
11
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
12
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
13
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
14
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
15
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
16
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
17
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
18
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
19
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
20
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
Daily Top 2Weekly Top 5

संकटाचे ओङो घेऊन शेतकरी लागला कामाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2019 12:40 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : मागील वर्षातील दोन्ही हंगाम पुरेशा पाण्याअभावी बळीराजाला उत्पन्न घेता आले नव्हते. ती उणिव भरुन ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : मागील वर्षातील दोन्ही हंगाम पुरेशा पाण्याअभावी बळीराजाला उत्पन्न घेता आले नव्हते. ती उणिव भरुन काढण्याच्या आशेवर शेतकरी यंदाच्या खरीप हंगामावर भरघोस उत्पन्नाची अपेक्षा करीत होता. परंतु हाही हंगाम निसर्गाच्या लहरीपणामुळे हिरावला गेला. खरीपातील नैसर्गिक अवकृपेचे ओङो सोबत शेतकरी पुन्हा यंदाचा रब्बी हंगाम निश्चितच तारेल या आशेवर पुन्हा कामाला लागला आहे. काही वर्षापासून सातत्याने निसर्गाचा लहरीपणा सुरू आहे. मागील वर्षी अपेक्षेनुसार पाऊस पाऊस झाला नव्हता. त्यामुळे प्रत्येक घटकात पाण्याच्या समस्या निर्माण झाल्या होत्या, तर शेतक:यांवर  मोठे संकट ओढवले होते. पाऊस  तथा पाण्याअभावी खरीपसह  रब्बी हंगामदेखील शेतक:यांना सोडावा लागला होता. या दोन्ही हंगामातील झालेले नुकसान   यंदाच्या खरीब हंगामात भरुन काढता येईल, या आशेवर शेतकरी  कामाला लागला होता. सुरवात वगळता काही प्रमाणात पाऊस चांगला राहिल्यामुळे भरघोस  उत्पन्नाची स्वपAे जिल्ह्यातील बहुतांश शेतक:यांनी रंगवली. परंतु आवश्यकता नसतानाही पाऊस सुरूच राहिला. त्यातच अतिवृष्टी देखील झाली, अतिवृष्टीनंतर काही दिवस वगळता सातत्याने पाऊस होत राहिल्यामुळे परिपक्व झालेली पिके सडत गेली अन् शेतक:यांच्या  हाता-तोंडाशी आलेला घास  पाहता-पाहता पावसाने हिरावून नेला. यंदा उद्भवलेले संकट प्रत्येक शेतक:यांना नाकी नऊ आणणारे ठरत आहे. या शेतरक:यांना आता केवळ शासकीय मदतीकडे लक्ष लागून आहे. खरीप हंगामात प्रत्येक शेतक:यांनी सहा महिन्यांची मेहनत व लाखोंचा खर्च चांगला उत्पन्नाच्या आशेवरच केला होता. त्यांची ही सर्व स्वपAे धुळीस मिळाली आहे. त्यामुळे त्यांच्यावर मोठे संकट ओढवले  असून ते एकप्रकारे त्यांच्या जीवनाचे ओङो आहे. खरीपातील या ओङयासह महासंकटाचा फारसा विचार न करता श्ेतकरी राजा  पुन्हा रब्बी हंगामासाठी तयारी करीत आहे. रब्बीत निसर्ग कितपत साथ देतो, याचाही फारसा विचार न करता, नेहमीप्रमाणे यंदाही शेतकरी बांधावर पोहोचला आहे. मशागतीसह विविध कामे सुरू केली आहे. रब्बी हंगामात पेरणीसाठी लागणा:या बियाण्यांसह खतांच्या मागणीचे नियोजन देखील कृषी विभागामार्फत करण्यात आले असून पेरणी  क्षेत्रानुसार खताची मागणीही करण्यात आली आहे.  

पावसाचे प्रमाण अधिक असल्यामुळे रब्बी हंगामात शेती करणा:या शेतक:यांमध्ये भर पडणार असून पेरणीचे क्षेत्र देखील वाढण्याची शक्यता आहे. या हंगामात शेतक:यांना बियाण्यांची कमतरता भासू नये, म्हणून कृषी विभागामार्फत बियाण्यांच्या मागणीत मोठी वाढ करण्यात आली आहे. जिल्ह्यातील 85 हजार 700 हेक्टर क्षेत्रावर पेरणी होणार असल्याचे गृहीत धरुन मागणी वाढवली आहे. मागील तीन वर्षातील बियाणे विक्रीचा आढावा घेत यंदाच्या रब्बी हंगामात ज्वारीसाठी 26 हजार 500 हेक्टर,  गहूसाठी 26 हजार हेक्टर, हरभरासाठी 24 हजार, करडईसाठी 150, मकासाठी चार हजार 100, सुर्यफुलसाठी 200 हेक्टर, बाजरीसाठी 50 हेक्टर, मूगसाठी 100 हेक्टर असे एकुण 85 हजार 700 हेक्टर क्षेत्र प्रस्तावित करण्यात आले आहे.