शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीतून प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरेंना डच्चू? ते पत्र व्हायरल, सुनेत्रा पवार म्हणाल्या...
2
मुख्यमंत्री विजय यांचा मोठा दणका! शाळा, मंदिरे आणि बसस्थानकांजवळील दारू विक्रीवर बंदी
3
कोणतीही शक्ती भारताला झुकवू वा दबावाखाली आणू शकत नाही, पंतप्रधान मोदींचे विधान
4
महामुंबई : इमारती की 'डेथ ट्रॅप': ८२७ इमारती अतिधोकादायक, १८,०७२ धोकादायक इमारती
5
केरळ मुख्यमंत्रिपदाचा वाद काँग्रेसच्या हायकमांडच्या दरबारात, आठवडा उलटला तरी नाव निश्चित नाही
6
आजचे राशी भविष्य: १२ मे २०२६: आर्थिक लाभ होईल, आजारी व्यक्तीच्या प्रकृतीत सुधारणा होईल
7
Petrol Diesel Price: जागतिक बाजारपेठेत इंधनाचा भडका! जगातील अनेक देशांत पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडले; भारताची नेमकी स्थिती काय?
8
हिमाचल-उत्तराखंडमध्ये जलप्रलय! मुसळधार पाऊस आणि गारपिटीने जनजीवन विस्कळीत; कोट्यवधींचे नुकसान
9
संकट : एक कोटी लोकांचा रोजगार धोक्यात; शेअर बाजार कोसळला, रुपया तळाला
10
इर्शाळवाडी ट्रेक ठरला जीवघेणा; डोंबिवलीतील २० वर्षीय रितेशचा मृत्यू, तरुणासोबत नक्की काय घडलं?
11
विशेष लेख: भगव्या बंगालमध्ये सगळ्यांना ‘भाकरी’ मिळेल का?
12
बाजारात 'सुवर्ण' धास्ती, देशाला बचतीची संधी; देशाला 'आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी' बनवण्याचा निर्धार
13
टिटवाळ्यात एक हजार चाळी बेकायदा, भूमाफियांकडे दुर्लक्ष; केडीएमसी महापालिकेसह पोलिसांचाही कानाडोळा
14
अन्वयार्थ: न्यायालय म्हणते, बोगस दिव्यांग ‘काळी मेंढरे’ सेवेतून हाकला !
15
लेख: शहरांनी सुरळीत धावण्यासाठी त्यांच्या पायांना कसली चाकं हवीत?
16
अग्रलेख: युद्धाच्या झळा, काटकसरीच्या कळा
17
युद्धाचा भडका उडणार? अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचा 'तो' प्रस्ताव फेटाळला, चिंता वाढली
18
मुंबईसह राज्यातील दुकाने, हॉटेल्स, मॉल्स २४ तास सुरू का नाहीत? उद्योग मंत्रालयाने निर्णय घेऊनही अंमलबजावणी नाही
19
अंबरनाथमध्ये आता शिंदेसेनेने भाजपपुढे ठेवला युतीचा प्रस्ताव, राजकीय खेळीची भाजपकडून चाचपणी
20
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
Daily Top 2Weekly Top 5

बाप्पांना दिला बिना वाद्य बिना मिरवणुकीने निरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2020 12:50 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहरात पहिल्या टप्प्यातील गणेश मूर्ती विसर्जन उत्साहात झाले. कुठेही ढोल, ताशांच गजर नाही, कुठेही ...

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शहरात पहिल्या टप्प्यातील गणेश मूर्ती विसर्जन उत्साहात झाले. कुठेही ढोल, ताशांच गजर नाही, कुठेही मिरवणुका नाही अशी स्थिती होती. केवळ टाळच्या गजरात बाप्पांचा जयघोष करीत परस्पर मूर्ती विसर्जन करण्यात आले. यासाठी नंदुरबार पालिकेतर्फे तीन ठिकाणी कृत्रिम विसर्जन तलाव तयार करण्यात आले होते. तर मोठा मारूती मंदीराजवळ पालिकेतर्फे मूर्ती स्विकारण्यासाठी वाहनाची व्यवस्था करण्यात आली होती.
नंदुरबारातील पहिल्या टप्प्यातील गणेश विसर्जन मिरवणुकादेखील भव्य दिव्य असतात. अनेक मोठी मंडळे त्यात सहभागी होतात. मुख्य मिरवणूक मार्गावरून या मिरवणुका काढल्या जातात. परंतु यंदा कोरोनामुळे सर्वत्र शांतता होती. कुठेही वाद्याचा गजर नाही, कुठेही मिरवणुका नाही, गर्दी नाही अशी स्थिती होती. कोरोनामुळे बाप्पांना कमी गर्दीत आणि कमी वेळेतच निरोप द्यावा लागला.
१९ मंडळांतर्फे विसर्जन
सार्वजनिक स्वरूपात गणेशोत्सव साजरा करणाऱ्या १९ मंडळांनी बाप्पांच्या मूर्तीचे गुरुवारी विसर्जन केले. दरवर्षी या मंडळांतर्फे आकर्षक व भव्यदिव्य मिरवणुका काढल्या जातात. आपापल्या भागातून निघून मंगळ बाजारमार्गे मुख्य मिरवणूक मार्गावर या मिरवणुका निघतात. रात्री उशीरापर्यंत मिरवणुकांची रेलचेल असते, उत्साह असतो. यंदा मात्र कुठेही मिरवणुका निघाल्या नाहीत. गुरुवारी मूर्ती विसर्जन केलेल्या मंडळांमध्ये शिवलालभाऊ सोनार यांचा प्रथम मानाचा गणपतीची पालखी, जय श्रीराम व्यायाम शाळा, जय हनुमान व्यायाम शाळा, द्वारकाधिश व्यायाम शाळा, वीर भगतसिंग व्यायाम शाळा, मातृवंदना प्रतिष्ठान, दादा हनुमान व्यायाम शाळा, आदर्श व्यायाम शाळा, महाराष्टÑ व्यायाम शाळा, संत शिरोमणी रविदास व्यायामशाळा या गणेश मंडळांचा यात समावेश असल्याचे प्रशासनाने दिलेल्या माहितीत म्हटले आहे.
तीन ठिकाणी कृत्रिम तलाव
नंदुरबारात पालिकेतर्फे तीन ठिकाणी कृत्रिम तलाव करण्यात आले होते. त्या ठिकाणी भाविकांनी मूर्ती विसर्जनासाठी गर्दी केली होती. त्यात साक्रीनाका भागातील दसेरा मैदानाजवळ, नळवा रस्त्यावरील वैशाली नगर परिसरात तसेच निझर रस्त्यावर सी.बी.पेट्रोलपंप मागे कृत्रिम तलाव करण्यात आले होते. वाघेश्वरी चौफुलीवरील नाल्याच्याय बाजुला करण्यात आलेला चौथा कृत्रीम तलाव तडकाफडकी बुजविण्यात आला.
तयार करण्यात आलेल्या तिन्ही कृत्रिम तलावांमध्ये मूर्ती विसर्जनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. सकाळी १० वाजेपासून तर सायंकाळी सहा वाजेपर्यंत गर्दी होती. या ठिकाणी पालिकेचे कर्मचारी, बंदोबस्तासाठी पोलीस कर्मचारी तैणात करण्यात आले होते. तलावाच्या आजुबाजुला बॅरीकेटींग करण्यात आले होते.
दसेरा मैदानाजवळील तलावाचे पाणी वाहते करण्यात आले होते. येथील नदीचे वाहते पाणी तलावात आणून ते पुन्हा पुढे प्रवाहीत करण्याची व्यवस्था करण्यात आली होती.
पालिकेतर्फे वाहन
घरगुती तसेच मंडळाच्या मूर्ती संकलीत करण्यासाठी मोठा मारूती मंदीराजवळ बंदीस्त वाहनाची व्यवस्था करण्यात आली होती. या ठिकाणी पालिकेचे कर्मचारी मूर्ती संकलीत करून त्या वाहनात व्यवस्थीत ठेवत होते. वाहन भरल्यावर या मूर्ती प्रकाशा येथील तापी पात्रात विसर्जीत करण्यासाठी नेल्या जात होत्या. या ठिकाणी देखील सकाळपासून रात्री उशीरापर्र्यत भाविकांनी मूर्ती ठेवण्यासाठी गर्दी केली होती.
ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त
मिरवणुका निघू नये, त्या कुणी काढण्याचा प्रयत्न करू नये यासाठी ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त तैणात करण्यात आला होता. याशिवाय पोलिसांचे गस्ती वाहन देखील विविध ठिकाणी फिरत होते.
ज्या ठिकाणी गणेश भक्तांची गर्दी होत होती ती पांगविण्याचा प्रयत्न होत होता. सकाळी नऊ वाजेपासून रात्री उशीरापर्यंत हा बंदोबस्त कायम होता.


‘लोकमत’मध्ये वृत्त येताच वाघेश्वरी चौफुलीवरील तलाव लागलीच बुजला


पालिकेतर्फे चार ठिकाणी करण्यात आलेल्या कृत्रिम तलावांपैकी वाघेश्वरी चौफुलीनजीक नाल्याच्या बाजुला करण्यात आलेला तलावाबाबत ‘लोकमत’ने गुरुवार, २७ रोजीच्या अंकात छायाचित्रासह वृत्त प्रसिद्ध केले होते. या नाल्यात गटारीचे पाणी, खराब मांस, हॉटेलचे उरलेले पदार्थ, कोंबडीचे पिसं फेकली जातात. त्यामुळे या ठिकाणी नेहमीच दुर्गंधी असते. अशा ठिकाणी कृत्रिम तलाव केला गेला. शिवाय तलावाच्या ठिकाणी जाण्यासाठी योग्य रस्ताही नव्हता. याबाबत वृत्तातून लक्ष वेधण्यात आले होते. या वृत्ताची प्रशासन आणि पालिकेने तातडीने दखल घेत सकाळी १० वाजताच हा तलाव बुजविला. गणेश भक्तांच्या भावना ‘लोकमत’ने दिलेल्या या वृत्तामुळे प्रशासनातर्फे पोहचल्याने वाचकांनी व शहरवासीयांनी समाधान व्यक्त केले.