किमती घसरल्याने टोमॅटो उत्पादक अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2020 12:25 IST2020-02-12T12:24:58+5:302020-02-12T12:25:08+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क लहान शहादे : सात महिन्यांपूर्वी ८०० रुपयात विकले जाणाऱ्या टमाटोच्या कॅरेटला सद्यस्थितीत केवळ ४० ते ५० ...

Falling tomatoes cause problems for tomato growers | किमती घसरल्याने टोमॅटो उत्पादक अडचणीत

किमती घसरल्याने टोमॅटो उत्पादक अडचणीत

लोकमत न्यूज नेटवर्क
लहान शहादे : सात महिन्यांपूर्वी ८०० रुपयात विकले जाणाऱ्या टमाटोच्या कॅरेटला सद्यस्थितीत केवळ ४० ते ५० रुपये भाव मिळत आहे. या मातीमोल भावामुळे काही शेतकऱ्यांकडून कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीसाठी आणलेले टमाटे योग्य भाव नसल्याने आवारातच फेकण्यात येत आहे.
मागील उन्हाळा व सात महिन्यांपूर्वी टमाटोला चांगला भाव मिळत होता, हे भाव कायम राहून नव्याने टमाटोची लागवड करणाºया शेतकºयांना भरघोस उत्पन्न मिळेल. या आशेवर जिल्ह्यातील बहुतांश शेतकºयांनी टमाटोची लागवड केली. परंतु शेतकºयांचा अंदाज खोटा ठरु लागला आहे. सात महिन्यांपूर्वी ८०० रुपयात विकले जाणारे कॅरेटभर टमाटे आता केवळ ४० ते ५० रुपयात विकले जात आहे. त्यामुळे नंदुरबार बाजार समितीत विक्रीसाठी आणलेले टमाटे अपेक्षित भाव मिळत नसल्याने मार्केट आवारातच फेकले जात आहे. शिंदे ता.नंदुरबार येथील श्रीराम पटेल या शेतकºयाने मोठ्या आशेवर टमाटोची लागवड केली. परंतु योग्य भाव मिळत नसल्यामुळे त्यांनी परत नेण्याचा खर्च वाचविण्यासाठी टमाटे मार्केटमध्येच फेकले.

Web Title: Falling tomatoes cause problems for tomato growers