दूध वाहतूक करणाऱ्या वाहनाचे बनावट कागदपत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2020 01:01 PM2020-04-10T13:01:16+5:302020-04-10T13:01:26+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : दूध वाहून नेणाºया वाहनाचे कागदपत्रांवरील इंजिन क्रमांक व प्रत्यक्षातील इंजिन क्रमांक यात तफावत आढळल्याने ...

Fake documents of milk transport vehicle | दूध वाहतूक करणाऱ्या वाहनाचे बनावट कागदपत्र

दूध वाहतूक करणाऱ्या वाहनाचे बनावट कागदपत्र

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : दूध वाहून नेणाºया वाहनाचे कागदपत्रांवरील इंजिन क्रमांक व प्रत्यक्षातील इंजिन क्रमांक यात तफावत आढळल्याने संशयावरून पोलिसांनी वाहन जप्त केले असून एकाविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
योगेश सुपेकर, रा.नांदुरखा, ता.अहमदनगर असे संशयीताचे नाव आहे. पोलीस सूत्रांनुसार, नंदुरबारात २ एप्रिल रोजी गांधी पुतळा परिसरातून दूध वाहतूक करणारे वाहन जात होते. त्याला अडवून पोलिसांनी त्यांच्याकडील कागदपत्रे तपासली. त्यात शंका आल्याने पोलिसांनी वाहनाची तपासणी केली. तसेच कागदपत्रे व वाहन आरटीओ कार्यालयात तपासणीसाठी पाठविले. आरटीओने कागदपत्रे तपासली असता त्यात कागदपत्रांवरील इंजिनचा क्रमांक व प्रत्यक्षातील इंजिन क्रमांक यात तफावत आढळून आली. शिवाय वाहनाच्या मागील बाजूस दूध वाहून नेण्यासाठी असलेल्या केबीनला वाहनाचा क्रमांक नसून त्यातही तफावत दिसून आली. त्यामुळे शासकीय विभागाची फसवणूक केल्याप्रकरणी जमादार चुडामन सोमा शिंदे यांनी फिर्याद दिल्याने योगेश सुपेकर यांच्याविरुद्ध नंदुरबार शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास फौजदार प्रवीण पाटील करीत आहे.

Web Title: Fake documents of milk transport vehicle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.