शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
2
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
3
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
4
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
5
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
6
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
7
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
8
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
9
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
10
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
11
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
12
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
13
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
14
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
15
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
16
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
17
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
18
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
19
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
20
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
Daily Top 2Weekly Top 5

मंदाणे येथे कोरोना रुग्ण आढळल्याने खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2020 12:42 IST

लोकमत न्यूज नेटवर्क मंदाणे : शहादा तालुक्यातील मंदाणे व परिसरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून ग्रामपंचायत, आरोग्य, महसूल ...

लोकमत न्यूज नेटवर्कमंदाणे : शहादा तालुक्यातील मंदाणे व परिसरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून ग्रामपंचायत, आरोग्य, महसूल व पोलीस प्रशासनातर्फे लॉकडाऊन पाळून अन्य उपाययोजना करण्यात आल्या. त्यामुळे एकही कोरोना रुग्ण आढळून आला नव्हता म्हणून सर्व व्यवहार सुरळीत झाले असतानाच अहमदाबादहून आलेली महिला कोरोनाग्रस्त असल्याचे निष्पन्न होताच गावासह परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. ग्रामस्थांमध्ये विशेषत: महिला वर्गात कमालीची भीती पसरली आहे.रविवारी रात्री उशिरा आलेल्या अहवालानंतर प्रशासनही खडबडून जागे झाले असून रात्री उशिरा रुग्णाच्या संपर्कातील मंदाणे व असलोद येथील तब्बल ३२ जणांना क्वारंटाईन करून मोहिदा येथील कोवीड सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यात २४ महिला व आठ पुरुषांचा समावेश आहे. तसेच या कोरोनाग्रस्त रुग्णाने उपचार घेतलेल्या असलोद व मंदाणे येथील खाजगी डॉक्टरांना परिवारासह १२ जणांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे.मंदाणे गेल्या तीन महिन्यापासून काळजी घेऊनही अखेर अहमदाबाद रिटर्न महिलेमुळे गावात खळबळ उडाली आहे. प्रशासनाने या घटनेमुळे आता संपूर्ण मंदाणे गाव प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून तर असलोद, भोरटेक, वडगाव, तितरी, वाघर्डे, भोंगरे, ओझर्टे, कलमाडी त.ह., दुधखेडा ही गावे बफर झोन म्हणून प्रांताधिकारी डॉ.चेतन गिरासे यांनी जाहीर केले असून मंदाणे गावात अत्यावश्यक सेवा वगळता अन्य सर्व वाहनांना ये-जा करण्यास प्रतिबंध करण्यात आले आहेत. यासाठी पोलीस, महसूल यंत्रणा तैनात करण्यात आली आहे.मंदाणे येथील एक कुटुंब अहमदाबाद येथे नोकरीनिमित्ताने स्थायिक झाले होते. त्या परिवारातील ५२ वर्षीय महिला गरोदर असलेल्या सुनेला घेऊन मंदाणे गावी काही दिवसापूर्वीच परतली होती. येथे आल्यानंतर त्या महिलेची प्रकृती बिघडल्याने खाजगी रुग्णालयात उपचार घेतला. तेव्हा संबंधित डॉक्टरांनी त्यांची न्यूमोनियाची चाचणी करवून घेतली. मात्र कोरोनासदृश्य लक्षणे आढळून आल्याने याबाबतची माहिती मंदाणे प्राथमिक आरोग्य केंद्राला कळविण्यात आले. आरोग्य केंद्रामार्फत त्या महिलेला तातडीने १३ जून रोजी जिल्हा रुग्णालयात सकाळी दाखल करण्यात आले. त्या महिलेचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले. त्या दरम्यान ग्रामपंचायतीने ग्रामस्थांना सतर्क राहण्याचे आवाहन करुन शनिवारपासूनच लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला व सर्वांचे लक्ष अहवालाकडे लागले. अखेर रविवार, १४ जून रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास या महिलेचा स्वॅब अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आल्याचे वृत्त गावात धडकले. या वृत्ताने गावात एकच खळबळ उडाली. ग्रामपंचायत, आरोग्य विभाग, पोलीस व महसूल यंत्रणेची झोपच उडाली. रात्रीच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पथकासह गावात येऊन ग्रामस्थांना सतर्क राहण्याचे आवाहन केले.मंदाणे गावात कोरोना रुग्ण आढळून आल्याने नागरिकांमध्ये कमालीची भीती निर्माण झाली असून विशेषत: महिलांमध्ये घबराट पसरली आहे. कोरोना विषाणूचे संक्रमण होऊ नये म्हणून गावात ठिकठिकाणी बॅरिकेटस लावण्यात येऊन अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवसाय बंद करण्यात आले आहेत. रुग्णाचा रहिवास असलेला परिसर, मेनरोड, बाजारपेठसह परिसराचे निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे.प्रांताधिकारी डॉ.चेतन गिरासे, तहसीलदार डॉ.मिलिंद कुलकर्णी, पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील हे गावावर लक्ष ठेवून आहेत. ग्रामस्थांनी घाबरुन न जाता दिलेल्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन सरपंच विजय सनेर, पं.स. सदस्या सुषमा साळुंके, उपसरपंच अनिल भामरे, ग्रामविकास अधिकारी शरद पाटील, पोलीस पाटील सुभाष भिल, तलाठी धनगर, वैद्यकीय अधिकारी डॉ.जितेंद्र पाटील यांनी आवाहन केले आहे.दरम्यान, अहमदाबाद येथून आलेल्या या महिलेला होम क्वारंटाईन राहण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या होत्या का? हातावर शिक्का मारला होता का? आदी प्रश्न उपस्थित होत आहेत.दरम्यान, लोणखेडा, ता.शहादा येथील मयत ६७ वर्षीय व्यक्तीचा कोरोना विषाणू बाधित असल्याचा अहवाल प्रशासनाला प्राप्त झाला असून त्याच्या संपर्कातील चार जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्यांच्या घशातील स्वॅबचे नमुने घेण्यासाठी मंगळवारी आरोग्य प्रशासनातर्फे नंदुरबार जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात येईल.मंदाणे, ता.शहादा येथील कोरोनाबाधीत महिलेच्या संपर्कातील लोकांचा शोध घेऊन मंदाणे येथील २० महिला व तीन पुरुष, असलोद येथील चार महिला व पाच पुरुष अशा ३२ जणांना मामाचे मोहिदे येथील शासकीय वसतिगृहातील कोरोना सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यातील जास्त संपर्कातील लोकांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहे. या महिलेने असलोद व मंदाणे येथे खाजगी डॉक्टरांकडे उपचार घेतल्याने तेथील डॉक्टरांनाही परिवारातील सदस्यांसह कंपाऊंडर व अन्य तीन जणांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे.