शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
3
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
4
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
5
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
6
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
7
विशेष लेख: नॉनस्टॉप ७० तास गेमिंग! खाणं, झोपणं तिथेच!
8
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
9
लेख: काँक्रीटच्या जंगलात चतकोर तरी मोकळी जागा ठेवाल का?
10
लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना झुकवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचे रहस्य!
11
आजचा अग्रलेख: शस्त्रे म्यान, गळचेपी सुरूच !
12
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
13
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
14
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
15
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
16
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
17
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
18
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
19
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
20
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
Daily Top 2Weekly Top 5

सातपुडय़ाच्या जंगलातून पाच किलोमीटर पायी चालून बदलले ईव्हीएम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2019 12:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : अक्कलकुवा मतदारसंघातील त्रिशुल ता़ धडगाव  येथील मतदान केंद्रातील ईव्हीएम मशिनमध्ये बिघाड झाल्यानंतर राखीव पथकाने ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : अक्कलकुवा मतदारसंघातील त्रिशुल ता़ धडगाव  येथील मतदान केंद्रातील ईव्हीएम मशिनमध्ये बिघाड झाल्यानंतर राखीव पथकाने जंगलातून वाट काढत पाच किलोमीटर पायी चालून ईव्हीएम बदलून दिल़े राज्यातील प्रथम क्रमांकाचा मतदारसंघ असलेल्या अक्कलकुवा-धडगाव मतदारसंघात पोलींग बूथ तयार करणे प्रशासनासाठी नेहमीच आव्हानात्मक राहिले आह़े रविवारी सातपुडय़ाच्या दुर्गम भागात पोहोचलेल्या कर्मचा:यांनी सोमवारी सकाळी मतदान केंद्रे सज्ज केली होती़ सकाळी सातपासून मतदान सुरु झाल्यानंतर धडगाव तालुक्यातील त्रिशुल-2 मतदान केंद्र क्रमांक 226 अंतर्गत मोजरापाडा येथील केंद्रात लावलेल्या ईव्हीएममध्ये बिघाड झाल्यानंतर मतदान विभागीय अधिकारी आणि तलाठी यांनी जंगल आणि नदीच्या पाण्यातून वाट काढून त्रिशुल 1 मतदान केंद्रापासून पाच किलोमीटर अंतरावरील मोजरापाडा येथील केंद्र गाठल़े याठिकाणी ईव्हीएम बदलून दिल्यानंतर पूर्ववत मतदान सुरु झाल़े अक्कलकुवा मतदार संघाचा 70 टक्के भाग हा सातपुडय़ातील अतिदुर्गम भागातील गाव व पाडय़ांचा समावेश असलेला आहे. यात नऊ मतदान केंद्र हे नर्मदा नदीच्या काठावर आणि सरदार सरोवरच्या बॅक वॉटरमध्ये येणारे असल्यामुळे या ठिकाणी जाण्यासाठी पक्का रस्ता नाही. त्यामुळे पाण्यातून बोटीद्वारे जावे लागते. त्यात मणिबेली, चिमलखेडी, धनखेडी, मुखडी, डनेल, बामणी, भादल, उडद्या व भाबरी या गावांचा व मतदान केंद्रांचा समावेश आहे. वाहनांप्रमाणेच या बाजर्ला देखील जीपीएस यंत्रणा लावण्यात आली होती. अक्कलकुवा येथून    मोलगीमार्गे गमन पॉईंटर्पयत हे कर्मचारी वाहनाद्वारे पोहचले. तेथून नर्मदेच्या बॅकवॉटरमधून ते बाजर्द्वारे रवाना झाले. मतदान झाल्यानंतर देखील परतीचा मार्ग त्यांचा असाच राहणार आहे.  भाबरी, उडद्या, भादल या तीन केंद्रांवर जाण्यासाठी      मतदान कर्मचा:यांना तीन    किलोमीटर अंतराची पायपीट करावी लागली.अक्कलकुवा मतदार संघातील 110  मतदान केंद्रांवर मोबाईल किंवा इतर दूरध्वनी साधनांची जोडणी नसल्यामुळे त्या मतदान केंद्रांना वायरलेस सेटची जोडणी देण्यात आली आहे. त्यासाठी 39 वॉकी टॉकी सेट उपलब्ध झालेली आहेत. होराफळी, धडगाव, व मोलगी या ठिकाणी रिपीटरहुन वॉकी टॉकी सेट नियंत्रित केले जाणार आहेत. या केंद्रांवर रनर ची देखील नियुक्ती करण्यात आली आहे.