शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
2
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
3
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
4
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
5
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
6
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
7
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
8
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
9
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
10
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
11
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
12
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
13
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
14
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
15
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
16
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
17
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
18
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
19
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
20
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

दररोज आठ हजार शेतकऱ्यांना मिळते घरबसल्या हवामानाची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:20 IST

स्थानिक ठिकाणी हवामानाची माहिती मिळावी, यासाठी ही सोय करण्यात आली आहे. या केंद्रामार्फत जिल्ह्यातील जवळपास आठ हजारांपेक्षा अधिक शेतकऱ्यांना ...

स्थानिक ठिकाणी हवामानाची माहिती मिळावी, यासाठी ही सोय करण्यात आली आहे. या केंद्रामार्फत जिल्ह्यातील जवळपास आठ हजारांपेक्षा अधिक शेतकऱ्यांना व्हॉट्‌स ॲपच्या व इतर माध्यमातून दर मंगळवारी व शुक्रवारी जिल्ह्याचा आणि तालुकानिहाय हवामानाचा अंदाज आणि कृषी सल्ला देण्यात येतो. यासोबतच नुकतेच हवामानाची माहिती मिळावी, यासाठी भारतीय हवामान विभागाकडून स्वयंचलित कृषी-हवामान केंद्र बसविण्यात आले असून, दर १५ मिनिटांनी हवामानाची आकडेवारी यामध्ये संकलित केली जाते. स्वयंचलित हवामान केंद्रांमधून कमाल आणि किमान तापमान, सापेक्ष आर्द्रता, वाऱ्याचा ताशी वेग, दिशा, सूर्यप्रकाशाचा कालावधी, पाऊस, जमिनीचे तापमान आणि जमिनीतील ओलावा या सर्व नोंदी उपलब्ध होतात.पिकांच्या पेरणीपासून ते काढणीपर्यंत हवामानाची माहिती मिळाल्याने शेतकऱ्यांना योग्य नियोजन करण्यास मदत होणार आहे.

पिकाच्या वाढीसाठी प्रामुख्याने योग्य तापमानाची गरज असते. आर्द्रतेचे प्रमाण, ढगाळ हवामान, पावसातील खंड आणि तापमान यावरून कीड व रोगांची तीव्रता अभ्यासणे शक्य होते. प्रत्येक पिकासाठी पाण्याची गरज वेगवेगळी असते. हंगामानुसारही पाण्याची गरज बदलते. या सर्व अभ्यासासाठी स्वयंचलित हवामान केंद्र अत्यंत उपयुक्त ठरते.

“स्वयंचलित कृषी-हवामान केंद्र” यामुळे तापमान, आर्द्रता, पाऊस, हवेचा वेग, जमिनीतील ओल व तापमान यांची माहिती तसेच जिल्हा कृषी हवामान केंद्रामार्फत हवामानाचा अंदाज यावर आधारित कृषी सल्ला मिळणार असल्याने शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी हवामान अंदाज व कृषी सल्ला मिळविण्यासाठी ८९९९२२६५६३ या नंबरवर संपर्क साधावा, असे आवाहन कृषी विज्ञान केंद्राचे कृषी हवामान शास्त्रज्ञ सचिन फड यांनी केले आहे.