शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

अडीच वर्षांपूर्वी आदेश निघूनही सिव्हिलचे मेडिकल कॉलेजकडे हस्तांतरणच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:29 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जानेवारी २०१९ मध्ये आदेश निघूनही जिल्हा रुग्णालय वैद्यकीय महाविद्यालयाकडे हस्तांतरणाची प्रक्रियाच झालेली नाही. केवळ ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नंदुरबार : जानेवारी २०१९ मध्ये आदेश निघूनही जिल्हा रुग्णालय वैद्यकीय महाविद्यालयाकडे हस्तांतरणाची प्रक्रियाच झालेली नाही. केवळ कागदोपत्री हस्तांतरण करण्यात आले असून, आता हस्तांतरण कराराची तीन वर्षांची मुदत आठ महिन्यांनी संपणार आहे. त्यामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयापुढे पेच निर्माण होणार आहे. दरम्यान, वैद्यकीय महाविद्यालयाकडे नियमित प्राध्यापक व कर्मचारी वर्ग नसल्याने आणि कोरोनाच्या स्थितीमुळे वैद्यकीय महाविद्यालयाने हस्तांतरण प्रक्रिया पार पाडली नसल्याचे समजते.

नंदुरबारात वैद्यकीय महाविद्यालयाची मागणी गेल्या १२ वर्षांपासूनची होती. तत्कालीन वैद्यकीय शिक्षणमंत्री तथा विद्यमान आमदार डॉ. विजयकुमार गावित यांनी २००९ मध्ये महाविद्यालय मंजूर केले होते. नंतर मध्यंतरीचा काळ गेल्यानंतर भाजप सरकारने पुन्हा २०१५ मध्ये महाविद्यालयास मंजुरी दिली. त्यानंतर आवश्यक बाबींची पूर्तता करीत २०२० हे वर्ष उजाडले. केंद्र सरकार स्तरावर खासदार डॉ. हिना गावित यांनी त्यासाठी नेटाने पाठपुरावा करीत महाविद्यालय सुरू केले आणि गेल्या शैक्षणिक वर्षापासून एमबीबीएसच्या पहिल्या वर्षाच्या अभ्यासक्रमाला सुरुवात झाली. त्यासाठी १०० विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला आहे; परंतु वैद्यकीय महाविद्यालयासाठी जिल्हा रुग्णालय अद्यापही महाविद्यालयाच्या ताब्यात आलेले नसल्याची स्थिती आहे.

४०० बेडचे रुग्णालय

वैद्यकीय महाविद्यालयासाठी किमान ४०० बेडचे रुग्णालय असणे आवश्यक असते. त्याची पूर्तता जिल्हा रुग्णालयाच्या माध्यमातून पूर्ण झाली होती. राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या समितीने जिल्हा रुग्णालयाची पाहणी करून त्यास मान्यता दिली होती. शिवाय आवश्यक त्रुटी काढून समितीने त्याची पूर्तता करण्याचे आदेश नोव्हेंबर २०१९ मध्ये दिले होेते. लागलीच त्या आदेशांची पूर्तता करून समितीला अहवाल देण्यात आला होता. समितीच्या शिफारशींवरून त्यावेळी राज्यातील एकमेव अर्थात नंदुरबारचे वैद्यकीय महाविद्यालय मंजूर झाले होते.

हस्तांतरणाचे आदेश

जानेवारी २०१९ मध्ये राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने आदेश काढून काही बाबी वगळता संपूर्ण जिल्हा रुग्णालय हे वैद्यकीय शिक्षण आणि औषधी विभागाकडे अर्थात नंदुरबारच्या वैद्यकीय महाविद्यालयाकडे तीन वर्षांसाठी हस्तांतरण करण्यात येत असल्याचे आदेश काढले. प्रत्यक्षात महाविद्यालय सुरू होताच ही हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार होती. आदेश निघून आज अडीच वर्षे झाली, तर महाविद्यालय सुरू होऊन नऊ महिने झाले तरी प्रत्यक्षात वैद्यकीय महाविद्यालयाने जिल्हा रुग्णालयाची हस्तांतरण प्रक्रिया पार पाडलेली नाही.

पदभरतीमुळे रखडले

वैद्यकीय महाविद्यालयात आवश्यक प्राध्यापकांची भरती, आवश्यक क्लिनिकल स्टाफ व इतर सुविधा नसल्याने वैद्यकीय महाविद्यालय हस्तांतरण प्रक्रिया पार पाडत नसल्याचे समजते. मंत्रिमंडळाने आवश्यक पदभरतीसाठी मंजुरी दिलेली आहे; परंतु गेल्या पाच महिन्यांपासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर केल्याने हा विषय बाजूला पडला असल्याचे समजते.

आजच वैद्यकीय महाविद्यालयाने जिल्हा रुग्णालय चालवायला घेतले तर तेवढी यंत्रणा त्यांच्याकडे नाही. त्यातच कोरोना रुग्णांवर उपचाराची बाब आणि इतर समस्या पाहता ते सध्या तरी वैद्यकीय महाविद्यालयाकडून पेलवले जाणार नाही, हे स्पष्टच आहे.

सर्वच पदे प्रभारी

सद्य:स्थितीत वैद्यकीय महाविद्यालयाची सर्वच पदे प्रभारी आहेत. त्यात थेट डीनदेखील प्रभारी आहेत. त्यांच्याकडे नंदुरबारसह इतर दोन महाविद्यालयांचा पदभार आहे. एमबीबीएसच्या पहिल्या वर्षासाठी आवश्यक असलेली प्राध्यापकांची पदेदेखील प्रतिनियुक्तीवर आहेत. त्यामुळे तातडीने पदभरती करून वैद्यकीय महाविद्यालय पूर्ण क्षमतेने सुरू करणे आवश्यक आहे.

सध्या ऑनलाइन क्लास

एमबीबीएसच्या पहिल्या वर्षासाठी दाखल १०० विद्यार्थ्यांचे क्लास तीन महिन्यांपासून ऑनलाइन सुरू आहेत. महाविद्यालय सुरू झाल्यानंतर किमान दीड ते दोन महिने प्रत्यक्षात क्लास झाले. त्यानंतर कोरोनामुळे विद्यार्थ्यांना घरी जाऊ देण्यात आले असून, ऑनलाइन वर्ग सुरू आहेत.