शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला! 'या' तीन नावांची चर्चा
2
पराभवानंतरही टीवीकेसोबत सत्तेत येण्याची काँग्रेसला संधी; तामिळनाडूत सत्ता समीकरण कसं जुळणार?
3
ममता बॅनर्जींनी पश्चिम बंगाल गमावला! संजय राऊत राहुल गांधींना म्हणाले, "जागे व्हा, आता आपण..."
4
प्रेयसीच्या भावावर सूड उगवण्यासाठी दीड वर्षाच्या चिमुरडीचा काटा काढला; १३ वर्षांनंतर न्याय मिळालाच!
5
हाय राईज बिल्डिंगमध्ये फ्लॅट घ्यायचे स्वप्न... नजारा काय दिसतो...; पण लाईट गेली की, धक्कादायक वास्तव
6
पाकिस्तानचा प्रसिद्ध मौलाना इदरीस तरंगजईची गोळ्या झाडून हत्या; दोन पोलीस गंभीर
7
निवडणूक संपताच सैन्याकडून बंगालच्या उपसागरात NOTAM जारी; पाकिस्तानशी आहे खास संबंध
8
भाजपचा बंगालमध्ये ऐतिहासिक विजय! मुख्यमंत्रीपदासाठी ४ नावांची चर्चा; शपथविधी सोहळ्याची मोठी तयारी
9
लग्नाच्या प्रश्नांना अन् दडपणाला कशी सामोरी जातेस? प्राजक्ता माळी म्हणाली, "जे तुमचं असतं..."
10
भीषण, भयंकर, भयावह! चीनमध्ये फटाक्याच्या फॅक्ट्रीत मोठा स्फोट; २१ जणांचा मृत्यू, ६१ जखमी
11
चिनी नागरिक स्वत:ला नेपाळी भासवत होता, नेपाळी नंबरची स्कूटर घेऊन भारतात घुसला अन्...
12
LNG Supply: कतारकडून पुरवठा थांबला, भारतानं कंबर कसली; ७ नव्या टाक्यांचा 'यासाठी' उपयोग होणार, काय आहे संपूर्ण प्लॅन
13
तिघांनी हल्ला केला, कोयता डोक्यात अडकला; सायन रुग्णालयातील थरारक व्हिडिओ, तो तरुण नेमका कोण?
14
Adhik Maas 2026: तब्बल ११ वर्षांनंतर दुर्मिळ योग! अधिक मासात सुख समृद्धीसाठी 'या' तीन गोष्टींचे करा दान!
15
ब्राझीलमध्ये विमान थेट इमारतीला धडकले; अपघाताचा थरारक Video आला समोर, ३ जण दगावले
16
लग्नाच्या पहिल्या वाढदिवसापूर्वीच संसार उद्ध्वस्त; शेजारणीवर जीव जडला, बायकोचा काटा काढला
17
‘सरकारने कुठलाही विचार न करता या आरोपीला हालहाल करून संपवावं’, नसरापूर प्रकरणी राज ठाकरेंचा रोखठोक सल्ला
18
Crude Oil Price Today: कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ: इराणच्या UAE वरील हल्ल्यानंतर ब्रेंट क्रूड $११४ पार; जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे दर
19
आता पुढचे लक्ष्य अखिलेश यादव; ममता बॅनर्जींचा पराभव करणाऱ्या सुवेंदू अधिकारींनी थोपटले दंड
20
Gold Silver Price Today : सोनं महागलं, चांदी झाली स्वस्त; आज काय आहेत नवे दर? पटापट चेक करा
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीत पुकारलेल्या आंदोलनाला १०० दिवस पूर्ण होऊनही शासन मागे हटायला तयार नाही; सरदार सरोवर प्रकल्प बाधितांकडून काळे झेंडे लावून शासनाचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:28 IST

केंद्र शासनाने शेतकरी विरोधात तीन काळे कायदे लागू केले आहेत. साहजिकच या कायद्यांमुळे शेतकरी वर्गावर उद्योगपतींकडून शेतकऱ्यांच्या जमिनीच हडप ...

केंद्र शासनाने शेतकरी विरोधात तीन काळे कायदे लागू केले आहेत. साहजिकच या कायद्यांमुळे शेतकरी वर्गावर उद्योगपतींकडून शेतकऱ्यांच्या जमिनीच हडप करण्याचा डाव रचण्यात आला आहे. या कायद्यांमुळे हिताऐवजी उद्योगपतींचाच अधिक लाभ होणार आहे. हे अन्यायकारक कायदे रद्द करण्यासाठी देशाची राजधानी दिल्ली व इतर बॉर्डरवर गेल्या १०० दिवसांपासून शेतकरींच आंदोलन सुरू आहे. शनिवारी आंदोलनाचा १०० वा दिवस आहे. तरीही केंद्र शासन कायदे मागे घ्यायला तयार नाही. केंद्र शासनाच्या मनमानी विरोधात व तेथील शेतकरी यांना समर्थन देण्यासाठी शनिवारी तळोदा तालुक्यातील नर्मदा नगर, रेवानगर, गोपाळपूर पुनर्वसन, वाडी पुनर्वसन, काथर्दे दिगर या सरदार सरोवर प्रकल्पात विस्थापित झालेल्या बधितांच्या वसाहतीत प्रकलपग्रस्तांनी काळे झेंडे दाखवत आंदोलन केले होते. आंदोलकांनी केंद्र शासन विरोधात घोषणा देऊन जोरदार निषेध केला होता. शेतकऱ्यांवर लादलेले काळे कायदे तातडीने मागे घ्यावे, अशी मागणीदेखील आंदोलकांनी केली आहे. या आंदोलनात महिलांची संख्या मोठी होती. दिवसभर आंदोलकांनी शासनाच्या काळ्या कायद्याचा निषेधार्थ विस्थापितांनी आपापल्या घरांवर काळे झेंडे लावले होते. ग्रामीण भागात प्रथमच शासन विरोधात असे आंदोलन झाल्याने गावकऱ्यांमध्ये एकच चर्चा दिसून आली. या आंदोलनात सरपंच पुण्या वसावे, हिरालाल पावरा, किर्ता वसावे, सियाराम पाडवी, निमजी वसावे, कृष्णा पावरा, भिका पावरा, नाथा पावरा, माण्या पावरा, धरर्मासिंग वसावे, लालासिंग वसावे, ओरसिंग पटले, कीर्ती वसावे, कांतीलाल पावरा, रवी पटले, गोरजी पावरा, रमेश वसावे, मानसिंग पवारा यांच्यासह ग्रामस्थ व दिगीबाई पावरा, सिमजी पावरा, वसंत वसावे, भिका पावरा, जेरमा वसावे, राहुल वसावे आदी उपस्थित होते.