शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

विसाव्याच्या जागी ‘अतिक्रमण’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:23 IST

नंदुरबार : शहरातील साक्री नाका ते दंडपाणेश्वर रस्त्यावर अमरधामच्या वळणावर एकाने अनधिकृत अतिक्रमण केले असून ही जागा अंत्ययात्रांच्या विसाव्याची ...

नंदुरबार : शहरातील साक्री नाका ते दंडपाणेश्वर रस्त्यावर अमरधामच्या वळणावर एकाने अनधिकृत अतिक्रमण केले असून ही जागा अंत्ययात्रांच्या विसाव्याची आहे. यामुळे प्रशासनाने तातडीने कारवाई करून अतिक्रमण हटवण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे. याबाबत निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.

परिसरातील नागरिकांनी दिलेल्या या निवेदनात, नंदुरबार नगरपालिकेचे अमरधाम हे साक्री नाका ते दंडपाणेश्वर मार्गावर आहे. नवापूर चाैफुलीकडे जाणा­ऱ्या रस्त्यालगत विसाव्याच्या जागी विनापरवानगी साधारण ४० फूट जागेवर एका व्यक्तीने टपरीवजा शेड तयार करून व्यवसाय थाटला आहे. पाताळगंगा नदी किनारी तयार करण्यात आलेल्या या शेडमध्ये रसवंतीचा व्यवसाय सुरू आहे. दरम्यान कोणत्याही प्रकारचे परवाने नसताना संबंधिताने याठिकाणी व्यवसाय सुरू केले आहेत. याठिकाणी तंबाखूजन्य पदार्थांची विक्रीही सुरू असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान परवाने नसताना मात्र संबंधिताने याठिकाणी वीजपुरवठाही घेतला आहे. वीज कनेक्शनसाठी वीज कंपनीकडून परवाना घेतला किंवा कसे याची कोणत्याही प्रकारची माहिती उपलब्ध नाही. या प्रकाराकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेले हे अतिक्रमण काढण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. निवेदनावर परिसरातील नागरिकांच्या सह्या आहेत.

अचानक उभ्या राहिलेल्या या शेडमुळे आश्चर्यही व्यक्त करण्यात येत होते. परंतु कोरोना आणि लाॅकडाऊन यामुळे व्यस्त असलेल्या प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले होते. परंतु नागरिकांनी निवेदन दिल्यानंतर हा प्रकार गंभीर असल्याचे समोर आले आहे.