शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

इम्युनिटी वाढवणाऱ्या सेंद्रिय भाजीपाल्यावर भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:32 IST

नंदुरबार : कोरोनासोबत लढा देताना शारीरिक आरोग्य अबाधित रहावे, यासाठी नागरिक इम्युनिटी वाढवणारे अन्नपदार्थ घेण्यावर भर देत आहेत. यातून ...

नंदुरबार : कोरोनासोबत लढा देताना शारीरिक आरोग्य अबाधित रहावे, यासाठी नागरिक इम्युनिटी वाढवणारे अन्नपदार्थ घेण्यावर भर देत आहेत. यातून भाजीपाल्याला सर्वाधिक पसंती असून शेतकरीही विविध भाज्यांची लागवड वाढवत आहेत.

नंदुरबार तालुक्याच्या विविध भागात ही लागवड करण्यावर शेतकरी भर देत आहेत. जिल्ह्यात लिंबू, अद्रक, पुदीना, हळद या अपारंपरिक पिकांसह पारंपरिक भाजीपाला पिकांना पसंती दिली जात आहे. ९० दिवसात येणारा हा भाजीपाला शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या तर नागरिकांना शारीरिकदृष्ट्या सक्षम करणार आहे.

कोरोनामुळे भाजीपाला लागवड करून तो सेंद्रिय पद्धतीने पिकवण्यावर शेतकरी भर देत आहेत. शारीरिक क्षमता वाढवणाऱ्या भाजीपाल्याच्या लागवडीवर शेतकरी भर देत आहेत. यातून रोप व बियाणे विक्री वाढली आहे.

-दीपक मराठे,

नर्सरीचालक, रांझणी ता. तळोदा.

पुदिना : जिल्ह्यातील विविध नर्सरी तसेच शेतकरी पुदिनाचे उत्पादन घेतात. त्यांच्याकडून रोपांना ठोक बाजारपेठेत विक्री करण्यात येते. शारीरिक क्षमता वाढीत पुदिनाला महत्त्व असल्याने शेतकरी वाढीव लागवड करत असल्याचे नर्सरी चालकांकडून सांगण्यात आले. उत्पादन अधिक आल्याने गेल्या काही दिवसात त्याचे दरही पडले.

शेवगा : बहुगुणकारी शेवगा जिल्ह्यात लागवड केला जात होता. परंतु त्याचे क्षेत्र कमी होते. परंतु गेल्या सहा महिन्यात शेवगा लागवडीचे क्षेत्र वाढले आहे. दीर्घ काळाचे पीक असलेल्या शेवग्याला मोठी मागणी आहे. यातून त्यांची झाडे लावली जात आहेत. अनेकांनी गुजरात राज्याच्या विविध भागातून रोपांची आवक केली होती.

मेथी : नंदुरबार तालुक्याच्या विविध भागात पारंपरिक पद्धतीने मेथी लागवड होते. बाजारात बाराही महिने मेथीची आवक होते. पाण्याच्या भरवशावर शेतकरी मेथीची लागवड करतात. मेथीला नागरिकांकडून सर्वाधिक पसंती देण्यात येत असून स्वस्त असल्याने खरेदी वाढली आहे.

हळद : कोरोना काळात हळदीचा वापर वाढला आहे. पश्चिम महाराष्ट्रात लागवड होणारे हळदीचे पीक आता नंदुरबार जिल्ह्यात आले आहे. जिल्ह्यात हळदीचे खडे धुण्याची सोय झाल्याने लागवड वाढली आहे. ओली हळद आणि त्याचा पाला यालाही औषधी गुणधर्म आहेत.

गवती चहा : अद्रकसोबतच गवती चहाला मोठी मागणी आहे. तालुक्यातील काही भागात गवती चहाची लागवड केली जाते. भाजीपाला उत्पादक शेतकरी त्याचे उत्पादन घेतात. बाजारात नगण्य दरात मिळणारी गवती चहा सर्वाधिक गुणकारी मानली जाते.