शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
2
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
3
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
4
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
5
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
6
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
7
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
8
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
9
'पक्षात एवढा अपमान होत असेल तर मी काँग्रेस सोडेल!', नितीन राऊत यांचा इशारा, विकास ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
10
वेळेविरुद्धची शर्यत! ५ मिनिटांचा उशीर अन् जाहीर माफी; महिला मंत्र्याचा 'तो' Video तुफान व्हायरल
11
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
12
'या' दोन शब्दांची जादू अनुभवून तर पाहा; मनातले सगळे नकारात्मक विचार क्षणात पळून जातील
13
काव्या मारनच्या SRH ला धक्का; पॅट कमिन्स परतणार अशी चर्चा रंगत असताना 'या' खेळाडूनं सोडली साथ
14
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
15
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
16
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
17
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
18
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
19
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
20
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

लसीकरणाबाबत ग्रामीण भागातील गैरसमज दूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:30 IST

जयनगर : तीन ते चार महिन्यापासून देशात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाची शिबिरे प्रत्येक गावोगावी सुरू करण्यात आली होती. मात्र, आता ...

जयनगर : तीन ते चार महिन्यापासून देशात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाची शिबिरे प्रत्येक गावोगावी सुरू करण्यात आली होती. मात्र, आता लसींच्या तुटवड्यामुळे मोजक्याच गावांमध्ये लसीकरण शिबिर होत आहेत. आता लसीकरणाबाबत लोकांमधील जाणीव - जागृतीमुळे गैरसमज दूर झाले असून, १८ ते ४४ वयोगटातील तरुणांना जयनगर येथे पहिल्या डोसची प्रतीक्षा आहे. ४५ वर्षाच्या पुढील व्यक्तींनी पहिला डोस घेतला आहे, त्यांना दुसऱ्या डोससाठी प्रतीक्षा करावी लागत आहे.

शहादा तालुक्यातील जयनगर येथे मे महिन्यात लसीकरणाची शिबिरे घेण्यात आली होती. त्यावेळी ४५ वर्षापुढील ज्या व्यक्तींनी पहिला डोस घेतला होता त्यांना आता दुसऱ्या डोससाठी वडाळी अथवा काहाटूळ येथे जावे लागत आहे. जयनगर येथे बरेच दिवस झाले तरी कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाचे शिबिर होत नाही. त्यामुळे जयनगर येथील ४५ वर्षापुढील सर्वच लोकांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे. मात्र, दुसरा डोससाठी लोकांना दुसऱ्या गावातील शिबिरांवर अवलंबून राहावे लागत आहे.

राज्य शासनातर्फे तसेच आरोग्य विभाग, स्थानिक पातळीवरील शिक्षक, समाजसेवी संस्था यांच्याकडून कोरोना लसीकरण जनजागृतीसाठी प्रत्येक गावांमध्ये युद्धपातळीवर प्रयत्न झाले होते. या जनजागृतीचा परिणाम सगळ्या लोकांमध्ये झाला असून, आता सर्वच लोकं लसीकरणासाठी इच्छुक आहेत. मात्र, सध्या कासवगतीने होत असलेल्या लसीकरणामुळे अनेक गावांमधील लोकांचा लसीकरणाचा पहिला व दुसऱ्या डोसचा कालावधी होऊनही त्यांना दुसरा डोस भेटत नाही. ज्या व्यक्तींचे लसीकरण बाकी आहे, त्यांचे लवकरात - लवकर लसीकरण करण्याची गरज आहे. कारण तिसऱ्या लाटेचा लहान बालकांना मोठ्या प्रमाणावर संसर्गाचा धोका होण्याची शक्यता अधिक आहे. म्हणून वेळीच लोकांचे लसीकरण केले नाही तर त्यांचा धोका कुटुंबासह इतर व्यक्तींनाही होणार आहे.