शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
2
दिल्लीत AC ब्लास्टने जैन कुटुंब संपलं; आईच्या छातीशी घट्ट बिलगलेला दीड वर्षांचा आरू अन् शेवटचा तो व्हिडिओ कॉल...
3
आईच्या जीवाभावाच्या मैत्रिणीनेच रचला १४ वर्षांच्या चिमुरड्याच्या हत्येचा कट; सीसीटीव्हीमुळे फुटलं भांडं!
4
Devendra Fadnavis : "राहुल गांधींना महिला विषयावर बोलण्याचा अधिकारच नाही", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका
5
"पप्पांनीच मम्मीला मारलं..."; पत्नीच्या मृतदेहाजवळ बसून ढसाढसा रडला, लेकीने केला पर्दाफाश
6
'मला जाळू नका आणि दफनही करू नका'; बहिणीची शेवटची इच्छा 'तिने' अशी केली पूर्ण; हाडांपासून बनवले विंड चाइम
7
पूर्ववैमनस्यातून तरुणाचा निर्घृण खून; पत्नीही गंभीर जखमी; तिन्ही आरोपी स्वतःहून पोलिसांत हजर
8
नसरापूर प्रकरण : ..तोपर्यंत कुठल्याही राजकारण्याने माझ्या घरी येऊ नये;पीडित मुलीच्या वडिलांनी स्पष्टच सांगितले
9
Devendra Fadnavis : "मुलीच्या वडिलांचे आभार, त्या नराधमाला कायद्याने मृत्युदंडाची शिक्षा द्यायचीय!", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्धार
10
थरार! मुलाला उडवलं अन् वडिलांना २ किमी बोनटवर फरफटत नेलं; हैदराबादमधील 'हिट अँड रन'ने देश हादरला!
11
Video - रीलसाठी पाण्याच्या टाकीवर चढले, शिडी तुटल्याने १६ तास अडकले; एकाचा मृत्यू, २ जखमी
12
"कायद्याच्या ताब्यात गेला, आता तो नराधम जगणार...", प्रवीण तरडेंनी व्यक्त केली खंत
13
सबका मालिक एक ! नीता अंबानी शिर्डीमध्ये... श्री साईबाबांच्या समाधीचे घेतले दर्शन (PHOTOS)
14
पंधराशेच्या बदल्यात लेकींवर अत्याचार करण्याचा अधिकार कुणाला दिलाय का? राऊतांचा सरकारला सवाल
15
Video: अजब शॉट! तिलक वर्माने जोरात फटका मारला अन् चेंडूच्या जागी महागडं घड्याळच उडालं...
16
चेन्नई विमानतळावर थरार! धावत्या विमानातून प्रवाशाची उडी; प्रशासनाची उडाली झोप
17
२ किलो सोनं, १५ हिंस्त्र कुत्रे, १५ गोल्ड लोन खाती; अंथरुणात लपलेल्या मोलकरणीचा पर्दाफाश
18
"पप्पा, जगणं अवघड झालंय...", वडिलांना फोन; न्यायाधीशाने संपवलं आयुष्य, पत्नीवर गंभीर आरोप
19
"देवाभाऊंच्या राज्यात ना लाडकी बहीण सुरक्षित, ना ३-४ वर्षांची बालिका"; काँग्रेसची बोचरी टीका
20
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
Daily Top 2Weekly Top 5

लिफ्ट अडकली तांत्रिक मान्यतेच्या कचाट्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2020 12:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू असलेल्या नवीन लिफ्टच्या बांधकामासाठीचे तांत्रिक अंदाजपत्रक पुणे येथे विद्युत विभागाकडे अडकले ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू असलेल्या नवीन लिफ्टच्या बांधकामासाठीचे तांत्रिक अंदाजपत्रक पुणे येथे विद्युत विभागाकडे अडकले आहे. प्राथमिक स्तरावरील सर्व काम पुर्ण झाले आहे. इमारतीला १८ वर्षानंतर लिफ्ट मंजूर झाली आहे.जिल्हा प्रशासकीय इमारतीचे काम करतांना लिफ्टची सोय कुठेही करण्यात आली नव्हती. चार मजली इमारत असतांना व दोन्ही प्रशस्त इमारतीमुळे कार्यालये शोधणे आणि तेथे पोहचण्यासाठी सर्वसामान्यांसह दिव्यांगांचीही मोठ्या प्रमाणावर परवड होते. त्यासाठी इमारतीला लिफ्टची सोय करावी अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून करण्यात येत होती. इमारत बांधकाला १८ वर्ष झालेली असतांनाही लिफ्टची सोय होत नव्हती. जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड यांनी इमारतीमधील आतील स्ट्रक्चर बदलवून बऱ्यापैकी लूक दिला आहे. याच अंतर्गत लिफ्ट देखील मंजुर करून घेतली. गेल्या सहा महिन्यांपासून त्याचे बांधकाम करण्यात येत असले तरी अद्यापही ते पुर्ण झाले नाही.लिफ्टची एकुण अंदाजीत रक्कम एक कोटी ९७ लाख ५० हजार रुपये इतकी आहे. यासाठी विद्युत विभागाची तांत्रिक मंजुरी घेणे आवश्यक असते. तसे तांत्रिक अंदाजपत्रक नाशिक विभाग विद्युत विभागाला पाठविण्यात आले होते. परंतु तेथून ते पुणे येथील वरिष्ठ कार्यालयात गेले आहे. त्यामुळे या ठिकाणी ते मंजूर झाले किंवा नाही याची माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.यामुळे लिफ्टचे काम अडकले आहे. तांत्रिक मंजुरी मिळाली तर लागलीच हे काम पुर्ण होणार आहे. यामुळे नागरिकांची, येथे कामे घेवून येणाºया सर्वसामान्यांची, वृद्ध व दिव्यांगांची मोठी सोय होणार आहे.