अज्ञात वाहनाच्या धडकेने वीज कर्मचारी ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2020 12:44 IST2020-06-16T12:43:52+5:302020-06-16T12:44:20+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : शिरपूर-शहादा रस्त्यावर सोनवद गावाच्या फाट्यावर अज्ञात वाहनाने धडक दिल्याने तालुक्यातील तोरखेडा येथील वीज वितरण ...

Electricity worker killed in unidentified vehicle collision | अज्ञात वाहनाच्या धडकेने वीज कर्मचारी ठार

अज्ञात वाहनाच्या धडकेने वीज कर्मचारी ठार

लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : शिरपूर-शहादा रस्त्यावर सोनवद गावाच्या फाट्यावर अज्ञात वाहनाने धडक दिल्याने तालुक्यातील तोरखेडा येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात आॅपरेटर म्हणून कार्यरत असलेले सुरेश गुलाबराव नेरपगार-पाटील (४९) यांचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी रात्री साडेआठ वाजेदरम्यान घडली.
तोरखेडा येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयातील आॅपरेटर सुरेश गुलाबराव नेरपगार-पाटील हे रविवारी रात्री विद्युत रोहित्र व कार्यालयीन काम आटोपून मोटारसायकलीने घरी जात होते. शिरपूर-शहादा रस्त्यावर सोनवद गावाच्या फाट्यालगत शहाद्याकडून भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात वाहनाने ठोस दिल्याने त्यांच्या डोक्याला जबर मार बसल्याने त्यांचा मृत्यू झाला. शुक्रवारी सायंकाळी जोराच्या वादळासह पाऊस झाल्याने शिरपूर रस्त्यावर झाडे उन्मळून पडली आहेत. ही झाडे अद्यापही न उचलण्यात आल्याने वाहतुकीला अडथळा ठरत आहेत. गेल्या दोन-तीन दिवसापासून विद्युत रोहित्र खराब होत असल्याने कमी-जास्त दाबाचा वीजपुरवठा होत आहे. वीज कंपनीचे कर्मचारी मेहनत घेऊन वीजपुरवठा सुरळीत करीत आहेत. सुरेश नेरपगार-पाटील यांनीही रविवारी दिवसभर काम करून रात्री घरी जात होते. घटनेचे वृत्त कळताच कुुकावल, कोठली व शहादा येथील वीज वितरण कंपनीचे कर्मचारी व नातेवाईक घटनास्थळी पोहोचले होते. सुरेश पाटील हे कुकावल येथील रहिवासी होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, दोन मुली असा परिवार आहे. त्यांच्या मृत्यूमुळे हळहळ व्यक्त होत आहे. अपघाताची सारंगखेडा पोलिसांत नोंद करण्यात आली आहे.

Web Title: Electricity worker killed in unidentified vehicle collision