शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
2
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
3
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
4
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
5
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
6
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
7
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
8
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
9
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
10
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
11
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
12
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
13
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
14
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
15
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
16
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
17
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
18
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
19
Video: डोंगराळ मार्गावरून जात असताना अचानक रस्ता खचला, बघता-बघता ट्रक आत रूतला अन् मग...
20
कडक निर्बंध, तरीही इराणचं तेल पोहचलं आशियात! अमेरिकेच्या डोळ्यात धूळ फेकत कसं निघालं जहाज?
Daily Top 2Weekly Top 5

३८ ग्रामपंचायतींची निवडणूक आणि ४९ ठिकाणी प्रभाग रचनेला स्थगिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2020 12:36 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यात करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा भाग म्हणून जिल्ह्यात सुरु असलेल्या ३८ ग्रामपंचायतींचा निवडणूक ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यात करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा भाग म्हणून जिल्ह्यात सुरु असलेल्या ३८ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम, ४९ ठिकाणी प्रभाग रचना, मतदार यादी कार्यक्रम स्थगित करण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने घेतला आहे़ याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी यांनी मंगळवारी दुपारी पारित केले़धडगाव तालुक्यात १६, नवापुर १४, शहादा ५ तर तळोदा तालुक्यातील ३ अशा एकूण ३८ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम सुरु आहे़ यासाठी सोमवारी मुदतीअंती एकूण ९४३ अर्जांची छाननी करण्यात आली़ मंगळवारी वैध अवैध अर्जांची माहिती देऊन माघारीची मुदत सुरु करण्यात आली होती़ परंतू तत्पूर्वीच आयोगाने कार्यक्रम स्थगित केल्याने तालुकास्तरावर तातडीने हा कार्यक्रम थांबवण्यात आला़ दरम्यान यासोबत नंदुरबार तालुक्यातील २२, शहादा २२, तळोदा ४ तर अक्कलकुवा तालुक्यात १ अशा ४९ ग्रामपंचायतींची मुदत डिसेंबरमध्ये संपणार आहे़ या गावांमध्ये प्रभाग रचना कार्यक्रम सुरु होता़ २१ मार्च रोजी प्रभागनिहाय मतदार याद्यांची घोषणा होणार होती़निवडणूक कार्यक्रम स्थगित झाल्याची माहिती तालुका मुख्यालयातून मिळाल्यानंतर इच्छुक निराश झाल्याचे दिसून आले़ गेल्या १५ दिवसात या कार्यक्रमाला एकवेळा मुदतवाढ तसेच जात पडताळणीची अट शिथिल करण्यात आली होती़ पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत ही निवडणूक स्थगित करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ़ राजेंद्र भारुड यांनी दिली आहे़