घोटाणे येथे वृद्धास कुºहाडीच्या दांड्याने मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2019 12:41 IST2019-12-25T12:41:19+5:302019-12-25T12:41:24+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : तालुक्यातील घोटाणे येथे शेतातील बांधावर ठेवलेला पाईप उचलून बाजूला ठेवणाऱ्या वृद्धास दोघांनी कुºहाडीच्या दांड्याने ...

The elderly man was stabbed to death in a scuffle | घोटाणे येथे वृद्धास कुºहाडीच्या दांड्याने मारहाण

घोटाणे येथे वृद्धास कुºहाडीच्या दांड्याने मारहाण

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : तालुक्यातील घोटाणे येथे शेतातील बांधावर ठेवलेला पाईप उचलून बाजूला ठेवणाऱ्या वृद्धास दोघांनी कुºहाडीच्या दांड्याने मारुन जखमी केले़ सोमवारी सकाळी साडेसात वाजता हा प्रकार घडला़
आनंदा पावबा धनगर यांनी आप्पा पावबा धनगर व रविंद्र अप्पा धनगर यांच्यासह सामाईक शेत बांधावर ठेवलेला पाईप उचलून बाजूला ठेवला होता़ यातून आप्पा व रविंद्र धनगर या दोघांनी आनंदा धनगर यांना मारहाण केली़ यातून ते जखमी झाल्याने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे़ तेथून उपचार पूर्ण केल्यानंतर त्यांनी फिर्याद दिली़
याबाबत आनंदा धनगर यांच्या फिर्यादीवरुन आप्पा धनगर व रविंद्र धनगर या दोघांविरोधात तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ तपास पोलीस नाईक अहिरे करत आहेत़

Web Title: The elderly man was stabbed to death in a scuffle