शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
2
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
3
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
4
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
5
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
6
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
7
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
8
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
9
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
10
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
11
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
12
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
13
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
14
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
15
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
16
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
17
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
18
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
19
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
20
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

युवकाची फसवणूक करून दुसरा विवाह करणाऱ्या युवतीसह आठ जणांवर शहाद्यात गुन्हा दाखल, पाच जणांना अटक, तीनजण फरार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:29 IST

शहादा : हिंगोली येथील युवतीने शहादा तालुक्यातील मंदाणे येथील युवकाशी पैसे घेऊन लग्न करून बेपत्ता झाल्यानंतर संबधीत युवतीने ...

शहादा : हिंगोली येथील युवतीने शहादा तालुक्यातील मंदाणे येथील युवकाशी पैसे घेऊन लग्न करून बेपत्ता झाल्यानंतर संबधीत युवतीने पुन्हा दुसरे लग्न केल्याची बाब समोर आल्यानंतर फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाल्यावर मंदाणे येथील युवकाने शहादा पोलिसात फिर्याद दिली. याप्रकरणी आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पाच संशयितांना अटक केली आहे तर उर्वरित तीन जण फरार झाले आहेत.

भूषण सैंदाणे, रा.मंदाणे असे फसवणूक झालेल्या युवकाचे नाव आहे. पोलिसांनी युवती पूजा तिची आई वंदना राजू शिंदे राहणार हिंगोली, रवींद्र गैभू गोपाळ रा.कुंभारी तालुका जामनेर, योगेश संजय साठे रा. अकोला प्रीती राजेश कांबळे रा. हिंगोली अशा पाच जणांना अटक केली आहे. तर या टोळीतील बाबाराव देवराव आंबले युवती पूजा चा भाऊ भैरव राजू शिंदे व पूजा प्रकाश साळवे सर्व राहणार हिंगोली हे तिघे जण फरार झाले आहे.

पोलीस सूत्रांनुसार,मंदाणे येथील भूषण संतोष सैदाने या युवकास बाबाराव देवराव आंंबले राहणार औरंगाबाद याने पाच मे रोजी लग्नासाठी एक मुलगी दाखवली. भूषण ला मुलगी पसंत पडल्यानंतर ६ मे रोजी मंदाने येथे त्याचा पूजा राजू शिंदे या मुलीशी विवाह पार पडला. लग्नकार्यासाठी भूषण च्या परिवाराने आंबले व मुलीच्या नातेवाईकांना एक लाख तीस हजार रुपये रोख रक्कम दिली होती. विवाह झाल्यानंतर पत्नी पूजा ही १४ मे पर्यंत मंदाने येथे राहिली मात्र १५ मेच्या पहाटे ती घरातून कोणालाही न सांगता अज्ञातस्थळी निघून गेली. सर्वत्र शोधाशोध घेतल्यानंतर भूषण याने शहादा पोलीस ठाण्यात पत्नी पूजा हरवल्या बाबत तक्रार दिल्यानंतर मिसिंग ची नोंद करण्यात आली.

२१ मे रोजी बेटावद येथे त्याच युवतीने दुसरा विवाह केल्याची बाब समोर आल्यानंतर फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर भूषण सैंदाणे याने फिर्याद दाखल केली. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहादा पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. तपास पोलीस निरिक्षक दीपक बुधवंत करीत आहे.