शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
7
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
8
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
9
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
10
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
11
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
12
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
13
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
14
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
15
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
16
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
17
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
18
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
19
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
20
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षणाची सुरू झाली वारी पण विद्यार्थी अद्यापही घरी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 13:08 IST

नंदुरबार वार्तापत्र मनोज शेलार लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : पाचवी ते बारावीचे वर्ग सुरू झाले, आता १५ फेब्रुवारीपासून वरिष्ठ महाविद्यालये ...

नंदुरबार वार्तापत्र

मनोज शेलार

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : पाचवी ते बारावीचे वर्ग सुरू झाले, आता १५ फेब्रुवारीपासून वरिष्ठ महाविद्यालये सुरू होत आहेत. साधारणत: मार्चमध्ये पहिले ते चौथीचेही वर्ग सुरू होण्याची अपेक्षा आहेच. हे सर्व करतांना मात्र विद्यार्थ्यांना शाळा, महाविद्यालयात येण्या-जाण्यासाठीच्या वाहनांचे नियोजन झालेले नसल्याचे चित्र आहे. त्यामुळेच नववी ते १२ वीचे वर्ग सुरू होऊन साधारणत: अडीच महिने झाले, परंतु विद्यार्थी उपस्थितीची टक्केवारी ३० टक्केच्या वर जाऊ शकली नाही. पाचवी ते आठवीचे वर्गातील पहिल्या आठवड्याची उपस्थिती देखील २० टक्केच्या आतच राहिली आहे. एकीकडे शाळा सुरू करण्याचा आग्रह असतांना दुसरीकडे विद्यार्थी उपस्थितीबाबतही नियोजन होणे आवश्यक आहे.कोरोनाचे रुग्ण आढळत असले तरी पूर्वीसारखी या आजाराची भीती आता राहिलेली नाही. आजाराचे गांभीर्य असले तरी किती दिवस तेच कवटाळून बसणार? ही मानसिकता झाल्याने शासनाने शाळा, महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. नववी ते १२ वीचे वर्ग यशस्वीरित्या सुरू झाल्यानंतर पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करण्यात आले. दहा दिवसांपेक्षा अधिक कालावधी लोटल्यानंतर हा प्रयोग देखील बऱ्याच प्रमाणात यशस्वी झाला आहे. आता महाविद्यालयांचा परिसर गजबजबणार आहे. १५ फेब्रुवारीपासून ५० टक्के उपस्थितीची मर्यादा घालून देत ते सुरू होतील. महाविद्यालयानंतर प्राथमिकचे वर्ग सुरू करण्याचे नियोजन शिक्षण विभागाचे आहे. साधारणत: मार्च महिन्याचा पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात प्राथमिक शाळा सुरू होऊ शकतील. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये हा त्यामागचा मुख्य उद्देश आहे. हे करतांना त्या त्या इयत्तांचा अभ्यासक्रम देखील किमान २५ ते ५० टक्केपर्यंत कमी करण्यात आलेला आहे.एकीकडे शाळा सुरू झाल्या असतांना दुसरीकडे शाळांमधील उपस्थिती वाढविण्यासाठीचे नियोजन नसल्याचे चित्र आहे. अद्यापही ६० ते ७० टक्के विद्यार्थी शाळेत येत नाहीत हे आकडेवारीवरून स्पष्ट होते. आदिवासी विकास विभाग व समाजकल्याण विभागाच्या आश्रमशाळांमध्ये यापेक्षा वेगळी स्थिती नाही. काही आश्रमशाळा तर नुुसत्याच नावाला सुरू आहेत. पाच ते दहा टक्के विद्यार्थी देखील अशा ठिकाणी उपस्थित नसल्याचे चित्र आहे.या सर्व बाबींना अनेक कारणे आहेत. त्यात प्रामुख्याने ग्रामीण भागात अद्याप वाहतूक व्यवस्था पूर्णपणे सुरू न होणे, मानव विकास मिशनसह इतर बसफेऱ्या पूर्वीप्रमाणे नसणे. होस्टेल सुरू करण्याबाबत निर्णय नसणे, शहरी भागात भाड्याने खोली घेऊन विद्यार्थी राहतीलही, परंतु कोरोनामुळे भाड्याच्या खोल्याही न मिळणे, पालकांच्या मनात अद्यापही कोरोनाविषयीची भीती कायम असणे, शाळांकडून, शिक्षण विभागाकडून विद्यार्थी उपस्थितीबाबत पालकांमध्ये जागृती करण्यात यश न येेणे यासह काही कारणे व घटक कारणीभूत आहेत. याशिवाय ग्रामीण, दुर्गम भागातील विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक वर्ष असेच गेले आता गेल्या वर्षाप्रमाणेच पुढील वर्गात टाकले जाईल ही मानसिकता रुजली आहे ती मानसिकता दूर करणे आवश्यक ठरणार आहे.शासनाने आता मानव विकास मिशनच्या सर्व बसेस पूर्वीच्या मार्गांवर सुरू करणे आवश्यक आहे. इतर बसेसच्या फेऱ्या देखील शाळा सुरू व सुटण्याच्या वेळेत सोडाव्या. शालेय विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या बसेस, मिनी बसेस, रिक्षा, व्हॅन यांना परवानगी देण्यात यावी. पालकांना त्यांच्या पाल्यांना शाळेत पाठविण्यासाठी वेळोवेळी आवाहन करून पाल्याचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे पटवून देणे आवश्यक आहे. शाळा सुरू करतांना ज्या प्रकारे काही बाबींमध्ये, नियमांमध्ये शिथिलता दिली गेली, त्या प्रमाणे विद्यार्थी उपस्थितीबाबत देखील काही निर्णय तातडीने घेऊन शाळांमधील विद्यार्थी उपस्थिती वाढविण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. यासाठी शाळा, शिक्षण विभाग आणि पालकांनी देखील आग्रही भूमिका घेणे आवश्यक ठरणार आहे.