शहरं
Join us  
Trending Stories
1
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
2
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
3
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
4
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
5
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
6
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
7
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
8
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
9
IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक
10
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
11
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
12
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
13
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
14
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
15
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
16
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
18
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
19
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
20
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
Daily Top 2Weekly Top 5

प्रकाशा येथे धुरळणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2019 12:24 IST

लोकमत न्यूज नेटवर्क प्रकाशा : शहादा तालुक्यातील प्रकाशा येथे डेंग्यूचे दोन रुग्ण आढळल्यानंतर गावात आरोग्य विभागामार्फत आठ टीम तीन ...

लोकमत न्यूज नेटवर्कप्रकाशा : शहादा तालुक्यातील प्रकाशा येथे डेंग्यूचे दोन रुग्ण आढळल्यानंतर गावात आरोग्य विभागामार्फत आठ टीम तीन करून सर्वे करण्यात येत आहे. ग्रामपंचायतीनेही चार फोगिंग मशीनद्वारे धुरळणीला सुरुवात केली आहे.प्रकाशा येथील गुप्तेश्वर मंदिर परिसरात व आठवडे बाजारात डेंग्यूचे दोन रुग्ण आढळल्यानंतर गुरुवारी दुसऱ्या दिवशीही आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घरोघरी जाऊन पाहणी सुरु केली आहे. गुरुवारीही इतर डासांसह डेंग्यूचे डास व अळ्या आढळून आल्या.स्वत: जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.आर.बी. ढोले यांनी पथकासह प्रकाशा गावाला भेट दिली सर्व्हे केला. डॉ.ढोले यांनी स्वच्छता, पाणी साठवण करण्याची जागा, साठवलेल्या पाणी अळ्या आहेत का? आदींची पाहणी करून ग्रामस्थांना कोरडा दिवस पाळण्याचे आवाहन केले व जनजागृतीचे पत्रक घरोघरी वाटप केले. ग्रामपंचायतीने उघड्या गटारी बंद करून गावाच्या आजूबाजूला जे ढबके आहेत ते बंद केले पाहिजेत, अशी सूचनाही त्यांनी ग्रामपंचायतीला दिली. कीटक समारक्षक अधिकारी किरण घाटबळे यांनीही गावातील काही घरातून एडिस आणि इतर डास पकडले आहे.प्रकाशा ग्रामपंचायतीतर्फे सरपंच सुदाम ठाकरे, ग्रामविकास अधिकारी बी.जी. पाटील यांनीही डेंगू सदृश्य परिस्थिती पाहता गावात चार फॉगिंग मशीनद्वारे फवारणीला सुरुवात केली. ग्रामविकास अधिकारी पाटील यांनी सांगितले की, येत्या गुरुवारी पूर्ण प्रकाशा गावात कोरडा दिवस पाळण्यात येणार असून त्यासंदर्भात आतापासूनच ग्रामपंचायतीकडून माहिती देण्यात येत आहे.