शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
2
दिल्लीत AC ब्लास्टने जैन कुटुंब संपलं; आईच्या छातीशी घट्ट बिलगलेला दीड वर्षांचा आरू अन् शेवटचा तो व्हिडिओ कॉल...
3
आईच्या जीवाभावाच्या मैत्रिणीनेच रचला १४ वर्षांच्या चिमुरड्याच्या हत्येचा कट; सीसीटीव्हीमुळे फुटलं भांडं!
4
Devendra Fadnavis : "राहुल गांधींना महिला विषयावर बोलण्याचा अधिकारच नाही", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका
5
"पप्पांनीच मम्मीला मारलं..."; पत्नीच्या मृतदेहाजवळ बसून ढसाढसा रडला, लेकीने केला पर्दाफाश
6
'मला जाळू नका आणि दफनही करू नका'; बहिणीची शेवटची इच्छा 'तिने' अशी केली पूर्ण; हाडांपासून बनवले विंड चाइम
7
पूर्ववैमनस्यातून तरुणाचा निर्घृण खून; पत्नीही गंभीर जखमी; तिन्ही आरोपी स्वतःहून पोलिसांत हजर
8
नसरापूर प्रकरण : ..तोपर्यंत कुठल्याही राजकारण्याने माझ्या घरी येऊ नये;पीडित मुलीच्या वडिलांनी स्पष्टच सांगितले
9
Devendra Fadnavis : "मुलीच्या वडिलांचे आभार, त्या नराधमाला कायद्याने मृत्युदंडाची शिक्षा द्यायचीय!", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्धार
10
थरार! मुलाला उडवलं अन् वडिलांना २ किमी बोनटवर फरफटत नेलं; हैदराबादमधील 'हिट अँड रन'ने देश हादरला!
11
Video - रीलसाठी पाण्याच्या टाकीवर चढले, शिडी तुटल्याने १६ तास अडकले; एकाचा मृत्यू, २ जखमी
12
"कायद्याच्या ताब्यात गेला, आता तो नराधम जगणार...", प्रवीण तरडेंनी व्यक्त केली खंत
13
सबका मालिक एक ! नीता अंबानी शिर्डीमध्ये... श्री साईबाबांच्या समाधीचे घेतले दर्शन (PHOTOS)
14
पंधराशेच्या बदल्यात लेकींवर अत्याचार करण्याचा अधिकार कुणाला दिलाय का? राऊतांचा सरकारला सवाल
15
Video: अजब शॉट! तिलक वर्माने जोरात फटका मारला अन् चेंडूच्या जागी महागडं घड्याळच उडालं...
16
चेन्नई विमानतळावर थरार! धावत्या विमानातून प्रवाशाची उडी; प्रशासनाची उडाली झोप
17
२ किलो सोनं, १५ हिंस्त्र कुत्रे, १५ गोल्ड लोन खाती; अंथरुणात लपलेल्या मोलकरणीचा पर्दाफाश
18
"पप्पा, जगणं अवघड झालंय...", वडिलांना फोन; न्यायाधीशाने संपवलं आयुष्य, पत्नीवर गंभीर आरोप
19
"देवाभाऊंच्या राज्यात ना लाडकी बहीण सुरक्षित, ना ३-४ वर्षांची बालिका"; काँग्रेसची बोचरी टीका
20
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
Daily Top 2Weekly Top 5

शहाणा-आमलाड मार्गामुळे विकासाला चालणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2020 12:19 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : मध्यप्रदेश ते गुजरात राज्याला जोडणारा न शहादा आणि तळोदा तालुक्यातून जाणारा ५३ किलोमिटरच्या राज्य ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : मध्यप्रदेश ते गुजरात राज्याला जोडणारा न शहादा आणि तळोदा तालुक्यातून जाणारा ५३ किलोमिटरच्या राज्य मार्गाचे काम प्रगतीपथावर आहे. १२ मिटरचा हा राज्यमार्ग शहादा तालुक्यातील शहाणा ते तळोदा तालुक्यातील आमलाडपर्यंत आहे. या मार्गामुळे दळणवळणाची सोय होणार असून दुर्गम भागातील गावे जोडली जाणार आहेत.एचएएमअंतर्गत जिल्ह्यात दोन राज्यमार्ग मंजुर झाले आहेत. पूर्वी जिल्हा मार्ग असलेल्या रस्त्यांची दर्जोन्नती करण्यात आली आहे. समशेरपूर ते करणखेडा व तेथून ढेकवद हा मार्ग आणि दुसरा मध्यप्रदेश सिमेपासून अर्थात शहाणापासून ते आमलाडपर्यंतचा दुसरा मार्ग यांचा समावेश आहे. हे दोन्ही मार्ग मध्यप्रदेश आणि गुजरात लगतच्या गावांमधून जाणार असल्यामुळे दळणवळणाची मोठी सोय होऊन या भागाचा विकासाला मदत होणार आहे.असा आहे मार्गमध्यप्रदेश व गुजरातला जोडणारे दोन राज्यमार्ग आहेत. परंतु ते थेट या दोन्ही राज्यांना जोडले जात नाहीत. त्यामुळे जिल्हा मार्ग असलेल्या रस्त्यांची दर्जोन्नती करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता. त्यात नंदुरबार जिल्ह्यातील दोन मार्गांचा समावेश करण्यात आला. पहिला समशेरपूर ते करणखेडा-ढेकवद व दुसरा शहाणा ते आमलाड हे मार्ग आहेत. पैकी शहाणा ते आमलाड हा मार्ग सर्वाधिक अर्थात ५३ किलोमिटर लांबीचा आहे. या मार्गावर शहाणा, मंदाणा, असलोद, सावखेडा, डोंगरगाव, शहादा, कलसाडी, जावदे, बोरद, मोड, आमलाड ही महत्वाची गावे आहेत. हा मार्ग थेट शहाणा येथून निघून अंकलेश्वर-बºहाणपूर महामार्गाला जोडला जाणार आहे. त्यामुळे सेंधवा, खेतिया, शिरपूर या मार्गाने येणाऱ्या वाहनांना थेट महामार्गाला जोडण्यासाठी हा रस्ता मोठा सोयीचा ठरणार आहे.१२ मिटर रुंदहा मार्ग १२ मिटर रुंदीचा आहे. ठिकठिकाणी फरशी व लहानपुलांची निर्मिती करण्यात येणार आहे. शहरी हद्दीत व मोठ्या गावांच्या हद्दीत हा मार्ग काँक्रीटीकरणाचा राहणार आहे. शिवाय ज्या गावातून मार्ग जाईल त्या गावातील हद्दीत दोन्ही बाजूंना गटारी करण्याची जबाबदारी देखील मार्ग तयार करणाºया ठेकेदाराची राहणार आहे. एचएएम अतंर्गत या मार्गाचे काम करण्यात येत आहे.वटवृक्षाला बाधा नाहीया मार्गावर असलोद ते मंदाणा दरम्यान असलेल्या वृक्षवृक्षाला तोडू नये यासाठी या भागातील नागरिकांनी मागणी केली होती. यासाठी लगतच्या शेतकºयाने जमीन देण्याचे देखील मान्य केले होते. त्यामुळे हा वटवृक्ष कायम राहणार असून त्याच्या दोन्ही बाजुंनी रोड राहणार आहे. त्यामुळे अनेकांनी सममाधान व्यक्त केले. मात्र, कलसाडी ते जावदा दरम्यानच्या अनेक वृक्षांवर कुºहाड कोसळली आहे. १२ मिटरच्या आत न येणारी वृक्ष देखील तोडण्यात आली आहेत. त्यामुळे नाराजीही व्यक्त करण्यात आली.