शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीचा ‘टक्का’ घसरला; ९४ हजार विद्यार्थी नापास; दहावीचा निकाल ९२% : प्रथम भाषा मराठीत ९२% उत्तीर्ण
2
सर्वांना मोफत घर नको, ‘कट ऑफ डेट’ वाढवू नका, ‘त्याच ठिकाणी’ कशाला?
3
प. बंगालमध्ये सुवेंदूच भाजपच्या सत्तेचे ‘अधिकारी’; मुख्यमंत्रिपदासाठी आठही प्रस्ताव सुवेंदू अधिकारी यांच्या एकट्याच्याच नावाचे
4
DC Vs KKR: कोलकाताकडून ‘दिल्ली’ सर, फिन एलनचे ४७ चेंडूत नाबाद शतक; १४.२ षटकांतच मारली बाजी!
5
निदा खानला लपवण्यात AIMIM नगरसेवक सामील?; CM देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले...
6
पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार? ३०००० कोटीवर पोहोचला तेल कंपन्यांचा तोटा; रोज ७०० कोटींचा फटका
7
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
8
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
9
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
10
टाटा समुहाचा 'दिग्गज' शेअर बनला रॉकेट; रेखा झुनझुनवालांच्या संपत्तीत एका दिवसात १३०० कोटींची वाढ! खास गिफ्ट देण्याच्या तयारीत कंपनी
11
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महेश आहेरची पोलीस कोठडीत रवानगी, भाेदू अशाेक खरातशीही कनेक्शन
12
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
13
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
15
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
16
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
17
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
18
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
19
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
20
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
Daily Top 2Weekly Top 5

मान्सूनपूर्व वा:यांमुळे फळपिकांना फटका

By admin | Updated: May 30, 2017 00:32 IST

वा:याचा वेग ताशी 40 ते 45 किलोमीटर : केळी, पपई, आंबा पिकांना नुकसानकारक

नंदुरबार : मान्सूनपूर्व वेगवान वारे यंदा वेळेवर येऊन धडकल्याने मान्सूनच्या आगमनाविषयी विविध आडाखे बांधले जाऊ लागले आहेत. यंदा जूनच्या पहिल्या आठवडय़ात पाऊस होईल याबाबतही कृषी तज्ज्ञांकडून दुजोरा दिला जात आहे. सध्या सुरू असलेल्या वा:याचा वेग ताशी 40 ते 45 किलोमीटर एवढा आहे. जिल्ह्यातील लघु व मध्यम प्रकल्पांमधील पाण्याचे बाष्पीभवन होण्याची प्रक्रीया जलदस्वरूपात सुरू आहे. वा:यांमुळे केळी, पपई, आंबा व उन्हाळी लागवड होणा:या कापसाला फटका बसत आहे.
यंदाचा उन्हाळा सर्वच अर्थाने तापदायक ठरला होता. एप्रिलच्या दुस:या आठवडय़ापासून तापमान 41 ते 44 अंश सेल्सीयसर्पयत राहिले होते. मध्यंतरी राज्यातील इतर भागात वळवाचा पाऊस झाला, परंतु जिल्ह्यात त्याचा मागमूसही राहिला नाही. त्यामुळे तापमान कमी होत नव्हते. गेल्या दोन आठवडय़ापासून तापमानाचा दिलासा मिळत आहे. 40 अंशाच्या आत तापमान राहत असल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. त्यातच वेगवान वारेदेखील वाहत असल्यामुळे तापमानापासून दिलासा मिळाला आहे. सध्या गेल्या तीन ते चार दिवसांपासून वेगवान वारे वाहत आहेत. या वा:यांमुळे अनेकांना हैराण करून सोडले आहे. पिकांनाही त्याचा फटका बसत आहे.
सध्या वाहणारे वारे हे मान्सूनपूर्व वारे असल्याचे कृषी तज्ज्ञांचे म्हणणे आहे. साधारणत: जूनच्या पहिल्या आठवडय़ात अशा प्रकारचे वारे वाहत असतात.  नैऋत्य दिशेकडून हे वारे वाहत असतात. आताही त्यांची दिशा तीच आहे. साधारणत: यांचा वेग मे महिन्याच्या दुस:या आठवडय़ात प्रतितास दहा ते पंधरा किलोमीटर इतका असतो. मे च्या शेवटच्या आणि जूनच्या पहिल्या आठवडय़ात त्यांचा वेग वाढून तो 40 ते 45 किलोमीटर प्रतितास इतका होतो. मान्सून दाखल झाल्यानंतर वा:याचा वेग मंदावतो. परंतु कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यास त्याचे स्वरूप चक्रीवादळात होत असते.
गेल्या वर्षाच्या तुलनेत मान्सूनपूर्व वेगवान वारे हे आठवडाभर उशिराने सुरू झाले आहेत. त्यामुळे मान्सून वेळेवर दाखल होईल अशी अपेक्षा आता जोर धरू लागली आहे. यंदा मान्सूनचे आगमन लवकर होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविलेला आहे. त्याला पुरक बाबी सध्या घडत आहेत.
फळ पिकांना फटका
वेगवान वा:यांमुळे फळ पिकांना फटका बसत आहे. जिल्ह्यात केळी, पपईसोबतच आंब्याचे क्षेत्रदेखील मोठे आहे. केळी व पपईचे झाडे तुटून पडण्याची शक्यता आहे. फळ असल्यास त्यांना भेगा पडणे किंवा तुटून खाली पडण्याचे प्रमाण वाढले आहे. आंबेदेखील वा:यामुळे       खाली पडून त्यांचे नुकसान होत    आहे.
जिल्ह्यातील धडगाव व अक्कलकुवा तालुक्यातील डोंगराळ भागात असलेल्या हजारो आंब्यांच्या झाडांपासून निघणा:या उत्पादनावर या भागातील अर्थकारण अवलंबून आहे. ही बाब लक्षात घेता दोन आठवडे आधीच सुरू झालेल्या मान्सूनपूर्व वा:यांमुळे आंब्याचेही मोठे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली  आहे. याशिवाय बागायतदार शेतक:यांनी लागवड केलेल्या उन्हाळी कापसालाही या वा:यांमुळे नुकसान होण्याची शक्यता वर्तविल जात   आहे.