शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
3
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
4
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
5
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
6
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
7
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
8
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
9
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
10
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
11
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
12
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
13
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
14
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
15
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
16
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
17
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
18
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
19
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
20
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
Daily Top 2Weekly Top 5

शासनाचा अध्यादेश कृषी विभागाने समजून न घेतल्याने शेतक:यांची दैना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2020 12:42 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शेतीमाल विक्रीसाठी शासनाने बाजार समित्या सुरू करण्याचा अध्यादेश काढला असला तरी हा अध्यादेश कृषी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शेतीमाल विक्रीसाठी शासनाने बाजार समित्या सुरू करण्याचा अध्यादेश काढला असला तरी हा अध्यादेश कृषी विभागाने समजून न घेतल्याने जिल्ह्यातील शेतक:यांचे माल विक्रीसाठी संभ्रम निर्माण झाला आहे. सध्या शेतक:यांच्या घरात धान्य पडून आहे. लॉकडाऊन मुळे बंधने आल्यामुळे त्यातून मार्ग काढत शासनाने बाजार समित्यांना धान्य खरेदी संदर्भात अध्यादेश काढले आहेत. त्यानुसार शेतक:यांनी ज्यांना धान्य विक्री करायची असेल त्यांनी तालुका कृषी अधिका:याकडे नोंद करावी व कृषी अधिकारी बाजार समितीतील गर्दी नियंत्रणात       राहावी यासाठी टोकण देतील अशा सुचना करण्यात आल्या आहेत. त्यानुसार शेतकरी तालुका कृषी अधिका:यांकडे माल विक्रीसाठी नोंद करीत असले तरी कृषी विभागाकडून मात्र शेतक:यांना बाजार समितीच्या निवडीबाबत बंधने आणली   जाताहेत. शेतक:यांची नोंदणी करतांना कृषी अधिकारी त्या त्या तालुक्याच्या ठिकाणच्याच बाजार समितींना माल विक्रीची सक्ती करीत आहेत. वास्तविक नंदुरबार बाजार समिती ही राज्यात सर्वदूर प्रसिद्ध  आहे. जिल्ह्यातील शेतकरी तेथे दरवर्षी धान्य विक्री करीत आहेत. तर शहादा बाजार समिती देखील हरभरा खरेदीसाठी सर्वदूर परिचित आहे. त्यामुळे शेतक:यांना हरभरा विक्री करायची असेल तर ते शहादा बाजार समितीत विक्री करतात. तर गहू विक्री करायची असेल तर नंदुरबार बाजार समितीत आणतात. परंतु तालुका  कृषी अधिकारी बाहेरील  तालुक्यातील शेतक:यांना तशी परवाणगी देत नसल्याने शेतकरी संभ्रमात पडले असून जिल्हाधिका:यांनी याबाबत लक्ष घालावे अशी मागणी केली आहे. वास्तविक शासनाचा अध्यादेशात असे कुठेही नमुद केलेले नाही. जिल्हा उपनिबंधकांशी आपण संपर्क साधला असता त्यांनी देखील कुठल्याही तालुक्याचा शेतकरी कुठल्याही बाजार समितीत धान्य विकू शकतो असे सांगितले आहे. त्यामुळे कृषी विभागाने नोंद करून त्या त्या बाजार समितीकडे पाठविणे आवश्यक आहे. परंतु त्यांनी अध्यादेश समजून न घेतल्याने गोंधळ होत आहे. -हरि दत्तू पाटील, शेतकरी, प्रकाशा.