शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
3
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
4
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
5
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
6
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
7
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
8
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
9
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
10
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
11
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
12
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
13
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
14
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
15
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
16
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
17
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
18
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
19
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
20
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
Daily Top 2Weekly Top 5

नियोजनाअभावीच शहरवासीयांना दोन दिवसाआड पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2019 12:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : गळती न रोखणे, धरणातील गाळ न काढणे यासह इतर नियोजन शून्य कारभारामुळेच शहरवसीयांवर पालिकेने ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : गळती न रोखणे, धरणातील गाळ न काढणे यासह इतर नियोजन शून्य कारभारामुळेच शहरवसीयांवर पालिकेने दोन दिवसाआड पाणी पुरवठय़ाची वेळ आणल्याचा आरोप विरोधी नगरसेवकांनी केला आहे.विरचक धरणात पाणी नसल्यामुळे पालिकेतर्फे 1 ऑगस्टपासून दोन दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तशी घोषणा आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी केली आहे. त्यावर विरोधकांनी टिका केली. त्यात म्हटले आहे की, पालिकेने यापूर्वीच 24 तास पाणी पुरवठय़ाची घोषणा केली आहे. असे असतांना उलट दोन दिवसाआड पाणी पुरवठा करावा लागत आहे. पालिकेने नळांना तोटय़ा न बसविणे, फुटलेल्या जलवाहिन्या दुरूस्त न करणे, धरणातील गाळ न काढणे, पाण्याच्या टाक्या भरून वाहने असे प्रकार होत असल्यामुळे पाण्याची नासाडी झाल्याचा आरोप भाजप नगरसेवकांनी केला आहे. यावर वेळीच उपाययोजना केल्या असत्या तर  शहरवासीयांवर ही वेळ आली नसती असेही विरोधकांनी काढलेल्या निवेदनात म्हटले आहे.