शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
3
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
4
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
5
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
6
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
7
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
8
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
9
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
10
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
11
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
12
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
13
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
14
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
15
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
16
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
17
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
18
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
19
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
20
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
Daily Top 2Weekly Top 5

मार्च एण्डमुळे ५० टक्के उपस्थितीला तिलांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:30 IST

नंदुरबार : मार्च एण्डमुळे सद्या विविध शासकीय कार्यालयांमध्ये कर्मचारी उपस्थिती कायम आहे. वास्तविक शासनाने कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शासकीय, निमशासकीय ...

नंदुरबार : मार्च एण्डमुळे सद्या विविध शासकीय कार्यालयांमध्ये कर्मचारी उपस्थिती कायम आहे. वास्तविक शासनाने कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शासकीय, निमशासकीय व खाजगी कार्यालयांमधील कर्मचारी उपस्थिती ५० टक्के ठेवण्यावर मर्यादा आणली आहे. परंतु त्यापेक्षा अधीक कर्मचारी उपस्थित राहत असल्याचे चित्र आहे.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भावामुळे शासनाने विविध उपाययोजना लागू केल्या आहेत. त्याअंतर्गत शासकीय, निमशासकीय कार्यालयांमध्ये उपस्थितीवर मर्यादा ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. परंतु सद्या मार्च एण्डचे कामे सुरू असल्यामुळे विविध विभागातील कर्मचारी उपस्थिती कायम राहत आहे. येत्या चार ते पाच दिवसात कामांची व्याप्ती मोठ्या प्रमाणावर राहणार असल्यामुळे कर्मचारी संख्या कायम ठेवावी लागणार आहे. दुसरीकडे मात्र अनेक कार्यालयातील कर्मचारी मोठ्या संख्येने कोरोना बाधीत झाल्याने अशा कार्यालयांमध्ये शुकशुकाट आहे.

जिल्हाधिकारी कार्यालय...

पुरवठा विभागात सात ते आठ कर्मचारी कोरोना पॅाझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे या विभागात कामाचा ताण मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. त्यामुळे ५० टक्के उपस्थितीवर मर्यादा आल्या आहेत. सद्या मार्च एण्डमुळे आहे त्या कर्मचाऱ्यांवर गाडा ओढावा लागत आहे.जिल्हा परिषद...

जिल्हा परिषदेतील विविध विभागातील काही कर्मचारी बाधीत आहेत. प्रत्येक विभागात कमी अधीक प्रमाणात ही स्थिती आहे. त्यामुळे सर्वच कर्मचाऱ्यांना कामावर बोलावावे लागत आहे. परिणामी ५० टक्के मर्यादा पाळणे दुरापस्थ होत आहे.

पंचायत समिती...

पंचायत समिती कार्यालयात देखील उपस्थिती मोठ्या प्रमाणावर दिसली. शिवाय कार्यालयाच्या आवारात देखील मोठी गर्दी कायम होती. कार्यालय हे शहराच्या मध्यवर्ती भागात असल्यामुळे या ठिकाणी मोठ्या संख्येने काम घेऊन येणाऱ्यांची दररोज गर्दी असते.