जयनगर येथे औषध फवारणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:31 IST2021-04-01T04:31:21+5:302021-04-01T04:31:21+5:30

सध्या जयनगर गावात कोरोनाचा एकही रुग्ण नसला, तरी सुरक्षिततेच्या दृष्टीने संपूर्ण गावात महात्मा फुले युवामंचचे अध्यक्ष ईश्वर माळी ...

Drug spraying at Jayanagar | जयनगर येथे औषध फवारणी

जयनगर येथे औषध फवारणी

सध्या जयनगर गावात कोरोनाचा एकही रुग्ण नसला, तरी सुरक्षिततेच्या दृष्टीने संपूर्ण गावात महात्मा फुले युवामंचचे अध्यक्ष ईश्वर माळी यांच्या स्वखर्चाने औषध फवारणी करण्यात आली. या कामी माळी यांना जयनगर येथील राहुल मेडिकलचे संचालक किरण पाटील यांचे सहकार्य लाभले. गावात सॅनिटायझरची फवारणी केल्यामुळे गावात किरकोळ सर्दी, खोकला यासारख्या इन्फेक्शनपासून लोकांचा चांगल्या प्रकारे बचाव होणार आहे. यावेळी सरपंच मीनाबाई सोनवणे, ईश्वर राजाराम माळी, ग्रामपंचायत सदस्य छगन पारधी, किशोर दंगल करंजे, विठोबा रामदास माळी, अशोक अभिमान माळी, लालजी भिल, धनराज नगराळे, अंकुश सोनवणे, राजाराम पाटील, दिनेश माळी, दीपक गोसावी, विश्वनाथ पाटील, संतोष पारधी, विठोबा माळी, अशोक मोतीलाल माळी, मच्छिंद्र गिरासे उपस्थित होते. फवारणीसाठी ग्रामस्थांचे सहकार्य लाभले. या अगोदरही महात्मा फुले युवामंचच्या वतीने मागील वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जयनगरसह धांद्रे, निंभोरे, धांद्रे खुर्द, उभादगड, कोंढावळ या गावांमध्येही ईश्वर माळी यांनी स्वखर्चातून औषध फवारणी केली होती. त्यांच्या या सामाजिक बांधिलकीबद्दल त्यांचे कौतुक होत आहे.

Web Title: Drug spraying at Jayanagar