शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
2
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
3
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
4
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
5
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याच कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
6
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
7
चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
8
भाजप सोडून नेताजी बोस यांचे पणतू चंद्रकुमार तृणमूलमध्ये, म्हणाले, ‘मी आता चूक सुधारली’
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
11
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
12
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
13
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
14
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
15
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
19
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
20
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
Daily Top 2Weekly Top 5

विना दरवाजा बस चालविण्यास नकार दिल्याने चालक निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2021 12:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा :  शहादा आगारातील विना दरवाजा असलेली बस चालविण्यास चालकाने नकार दिल्याने आगार प्रमुखांनी संबंधित चालकाच ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा :  शहादा आगारातील विना दरवाजा असलेली बस चालविण्यास चालकाने नकार दिल्याने आगार प्रमुखांनी संबंधित चालकाच निलंबित केल्याची घटना घडली. दरम्यान या घटनेबाबत चालकांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.शहादा बस आगारातील एम.एच. २० डीएल- ३३९३ या क्रमांकाची बस प्रतिष्ठीत सेवा म्हणून शहादा-मुंबई  अशी दररोज सायंकाळी सात वाजता सुटते. सदर बस चालक अनिल मासूळ यांनी चालकाच्या बाजूला असलेला मुख्य दरवाजा नसल्याने बस चालविण्यास नकार दिला. परिणामी दररोज सायंकाळी सात वाजता सुटणारी ही बस सुमारे दोन तास उशिरा रात्री नऊ वाजता मुंबईसाठी  रवाना झाली. चालकाच्या या कृत्यामुळे परिवहन विभागाचे आर्थिक नुकसान झाले, त्याचप्रमाणे प्रवाशांचा विनाकारण दोन तास खोळंबा झाला या कारणावरून आगार प्रमुख योगेश लिंगायत यांनी चालक मासूळ यांना १७ डिसेंबर रोजी निलंबित करीत ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली. ही बस शहादा येथून मुंबई सेंट्रल येथे पोहोचल्यानंतर वरळी डेपोत जमा करावयाची  होती व दुसऱ्या दिवशी सायंकाळी सातच्या सुमारास ही बस शहाद्याला परत आणायची होती.बस चालक मासूळ यांनी बस चालविण्यास नकार दिल्यामुळे आगार प्रमुखांनी दुसऱ्या चालकाला तात्काळ नियुक्ती करून दोन तासानंतर ही बस मुंबईसाठी रवाना झाली. शहादा आगारात अनेक बसेसला चालकाच्या बाजूचा पुढील दरवाजा नसल्याने त्या तशाच धावत असल्याचा आरोप चालकाने केला असून यामुळे प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता वर्तविली आहे.

कोरोना विषाणू संक्रमणाच्या काळात राज्य परिवहन महामंडळाने मुंबईच्या बेस्टशी करार केला असून महामंडळाच्या आदेशानुसार मुंबईला पाठविण्यात येणाऱ्या बसचा चालकाच्या बाजूला असलेला दरवाजा काढण्यात येत आहे. बसेसला डॉकिंग करण्यासह इतर तांत्रिक कारणासाठी दोन ते तीन महिन्यानंतर पुन्हा शहाद्याला आणणे गरजेचे असते. चालक मासूळ याने कारण नसताना बस चालविण्यास नकार दिला. त्यामुळे दोन तास प्रवाशांचा वेळ गेला व महामंडळाचे आर्थिक नुकसान झाले म्हणून त्यास निलंबित करण्यात आलेले आहे. बेस्टशी करार केल्यामुळे महामंडळाला अतिरिक्त उत्पन्न मिळत असून यातून कर्मचाऱ्यांचे पगार करणे शक्य होत आहे.-योगेश लिंगायत, आगार प्रमुख, शहादा.

आरटीओच्या नियमानुसार चालकाच्या बाजूला असलेला पुढील दरवाजा बसला असणे आवश्यक आहे. प्रतिष्ठीत सेवेअंतर्गत शहादा ते मुंबई असा सुमारे साडेचारशे किलोमीटर अंतर प्रवास असल्याने प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी मी दरवाजा नसलेली बस चालविण्यास नकार दिला. अशी बस मी मुंबईला नेली असती तर माझा वाहन चालक परवाना आरटीओकडून निलंबित होण्याची शक्यता होती. परिणामी मी नकार दिला. मात्र आगार प्रमुखांनी  मला निलंबित केले आहे. -अनिल मासूळ, बस चालक, शहादा आगार.