डोंगरगाव चौफुली ठरतेय धोकेदायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:29 IST2021-05-15T04:29:11+5:302021-05-15T04:29:11+5:30

शहादा बायपास रस्त्यावरील डोंगरगाव चौफुलीवर रोजच मोठी वर्दळ असते. लोणखेडा, डोंगरगाव, शहादा, दोंडाईचा रस्ता येथून रोजच शेकडो वाहने ये-जा ...

Dongargaon is dangerous | डोंगरगाव चौफुली ठरतेय धोकेदायक

डोंगरगाव चौफुली ठरतेय धोकेदायक

शहादा बायपास रस्त्यावरील डोंगरगाव चौफुलीवर रोजच मोठी वर्दळ असते. लोणखेडा, डोंगरगाव, शहादा, दोंडाईचा रस्ता येथून रोजच शेकडो वाहने ये-जा करतात. तसेच मोटारसायकलीवर प्रवास करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. तसेच डोंगरगाव चौफुली परिसरात मोठ्या प्रमाणावर खासगी रुग्णालये आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. येथे रस्ता ओलांडताना झालेल्या अपघातात अनेकांचे बळीही गेले आहेत. काहीजण कायमचे जायबंदीही झाले आहेत. कोळदा-खेतिया रस्त्याचे विस्तारीकरण करताना डोंगरगाव चौफुलीवर गतिरोधक बसविण्याची मागणी नागरिकांनी केली होती. मात्र, त्याकडे कोणीही गांभीर्याने लक्ष दिले नाही.

रस्ता ओलांडण्यासाठी कसरत

रस्ता ओलांडताना नागरिकांना मानवी साखळी करावी लागते. एकाचवेळी चार दिशांनी येणाऱ्या वाहनांना चुकवत रस्ता ओलांडण्याची रोजच कसरत करावी लागते. ट्रॅ‌फिकमुळे रस्ता ओलांडताना असा रोजच जिवाशी खेळ सुरू असतो. वृद्धांची व महिलांची तर मोठी गैरसोय होते. वृद्धांना कोणाचा तरी आधार घेत मार्ग काढावा लागतो.

Web Title: Dongargaon is dangerous